Subsidy Malpractice : अनुदान गैरव्यवहारप्रकरणी सात कर्मचाऱ्यांचे निलंबन

Action of Suspension : कुही तालुक्यात अतिवृष्टीची कोट्यवधींची रक्कम बोगस शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Suspension
SuspensionAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : कुही तालुक्यात अतिवृष्टीची कोट्यवधींची रक्कम बोगस शेतकऱ्यांच्या खात्यात वळती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, या प्रकरणी सात कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सरकारने २०२२-२३ या वर्षामध्ये शेतीपिकांच्या नुकसानीच्या भरपाईकरिता १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टरी मदत घोषित केली. मदत तीन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात आली होती. शेतकऱ्यांच्या सातबाराचा वापर करून रक्कम मात्र दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यात वळती करण्यात आली. १४ हजारांवर शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम वळती करण्यात आली असून ही रक्कम ३४ कोटींच्या घरात असल्याचा मुद्दा विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला होता.

Suspension
Gramsevak Suspension : ग्रामसेवकांवर निलंबनाची टांगती तलवार

त्याची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी उमरेडचे उपविभागीय अधिकारी विद्यासागर चव्हाण यांच्या अध्यक्षतेत पाच सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली. २९ गावांतील ५०० वर शेतकऱ्यांच्या नावाचा वापर ही रक्कम लाटण्यासाठी झाल्याचे तथ्य प्राथमिक चौकशीत समोर आले. जवळपास १ कोटी ४० लाखांची रक्कम लाटल्याचे चौकशीत समोर आले.

याप्रकरणी रॉजर गेडाम, स्नेहदीप मेश्राम, अनंत कासोट, मोहित पाटील, शालीनी मोकाशी व आकाश शेंडे या सहा तलाठ्यांना निलंबित करण्यात आले. त्याचप्रमाणे महसूल सहायक प्रमोद तिजारे यांच्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली. तलाठी वैशाली पडोळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली. काही कर्मचाऱ्यांकडून रक्कमही परत करण्यात आली.

Suspension
Milk Subsidy : गायीच्या दूध अनुदानात दोन रुपयांची वाढ

मिळालेल्या माहितीनुसार रक्कम लाटण्यासाठी ज्या खात्यांचा वापर झाला, त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांचे असल्यास त्यांच्यावरही कारवाईचा बगडा उभारण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

५०० शेतकऱ्यांच्या नावाचा गैरवापर

२९ गावांतील जवळपास ५०० शेतकऱ्यांच्या नावांचा वापर झाल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. बोगस शेतकऱ्यांच्या खात्यांचीही तपासणी करण्यात येणार आहे. हे खाते शासकीय कर्मचाऱ्यांचे असल्‍यास त्यांच्यावरही कारवाईचा बडगा उभारण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com