Maize Production Agrowon
ॲग्रो विशेष

Summer Sowing : उन्हाळी हंगामातील पिकांचे क्षेत्र ५०० हेक्टरने वाढले

Summer Crop : जिल्ह्यात सन २०२४-२५ या वर्षात कमी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामातील क्षेत्र कमी झाले होते. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातही पिकांची पेरणी कमी झाली होती.

Team Agrowon

Sangli News : गत वर्षी सरासरीपेक्षा जास्त पावसामुळे यंदाच्या उन्हाळी हंगामातील मका, भुईमूग पिकांच्या लागवडीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. उन्हाळी हंगामातील पेरणी आटोपली असून २८६४ हेक्टरवर पिकांची पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ५११ हेक्टरने वाढ झाली असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

जिल्ह्यात सन २०२४-२५ या वर्षात कमी पावसाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामातील क्षेत्र कमी झाले होते. त्याचबरोबर उन्हाळी हंगामातही पिकांची पेरणी कमी झाली होती.

गतवर्षी उन्हाळी हंगामात २ हजार ३५३ हेक्टर म्हणजे ६६ टक्क्यांवर पेरणी झाली असून त्यामध्ये प्रामुख्याने मका आणि भुईमूग पिकांची पेरा होता. मका पिकाचे २००४ हेक्टर क्षेत्र होते. तर भुईमुगाचे तेवढ्याच हेक्टरवर शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

यंदा पाण्याची टंचाई भासली नसल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांच्या पेरणीचे नियोजन केले होते. त्यानुसार मका, भूईमुग, या पिकांची पेरणी झाली आहे. उन्हाळी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.

या हंगामातील सरासरी क्षेत्र ३ हजार ५१८ हेक्टर असून त्यापैकी २८६४ हेक्टर म्हणजे ८१ टक्के पेरणी झाली आहे. सोयाबीन आणि सूर्यफूल पिकांच्या पेरणीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे.

चाऱ्याचे क्षेत्र घटले

जिल्ह्यात उन्हाळी हंगामात चारा पिकाची ही मोठ्या प्रमाणात लागवड होते. गतवर्षी ४ हजार ५१९ हेक्टरवर लागवड झाली होती. यामध्ये मका, कडवळ, नेपिअरया पिकांची लागवड झाली होती. यंदाच्या हंगामात ३ हजार ५८५ हेक्टरवर चारा पिकाची लागवड झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात ९३४ हेक्टरने चारा पिकाचे क्षेत्र कमी झाले असल्याचे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालत नमूद केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Issue: पूल नसल्यामुळे गावात येईना वाहन; शेतीमालाची करता येईना विक्री

Farmer Demand: केळीची विना परवाना खरेदी, खरेदीदारांची मनमानी बंद करा

Hydroponics Farming: कमी जागेत होणारी पाण्यावरची हायड्रोपोनिक्स शेती

Fertilizer Price Issue: नायगावमध्ये रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

SCROLL FOR NEXT