Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’विरोधात ‘चक्का जाम’

Farmers Protest : अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, धायगुडा पिंपळा आणि परळी तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी शेतकरी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत रास्तारोको केला.

Team Agrowon

Beed News : शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तिपीठ महामार्गास शेतकऱ्यांचा कडाडून विरोध होत असून राज्य सरकारने हा प्रस्तावित महामार्ग तत्काळ रद्द करावा, यासाठी बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यांतील शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १) कृषी दिनी अनेक ठिकाणी रास्तारोको करून या महामार्गास तीव्र विरोध केला.

अंबाजोगाई तालुक्यातील बर्दापूर, धायगुडा पिंपळा आणि परळी तालुक्यातील तळेगाव या ठिकाणी शेतकरी महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत रास्तारोको केला.

धायगुडा पिंपळा या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुरुष महिलांना अटक करून दुपारी सोडण्यात आले. किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे, मुरलीधर नागरगोजे, भाई मोहन गुंड, भगवान बडे, मदन वाघमारे व्यंकट ढाकणे, सुशील शिंदे, मारुती इरलापल्ले, ॲड.

जावेद पटेल, दीपक शिंदे, अरुण पाटील, पुंडलिक धायगुडे, बावणे विठ्ठल, मीना डांगे, आशा पवार, भानुदास मुंडे, मारुती डांगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो शेतकरी या ठिकठिकाणी रास्तारोको आंदोलनात सहभागी झाले होते.

या वेळी किसान सभेचे ॲड. अजय बुरांडे म्हणाले की, सरकार शेतकरीविरोधी भूमिका घेत आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या सीमांकन आणि जमीन संपादनासाठी पोलिसी बळाचा वापर करत आहे. अधिकारी देखील शेतकऱ्यांना धमक्या देण्याचा प्रकार बीड जिल्ह्यात सुरू आहे. सत्तेचा आणि बळाचा हा गैरवापर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Sowing Update: राज्यात केवळ तीन टक्के पेरण्या

Maharashtra Rain Forecast: राज्यात मेघगर्जना, विजांसह वादळी पावसाची शक्यता

Tree Plantation: नाशिकमध्ये एक लाख वृक्ष लागवडीचा संकल्प

Power Supply Issue: वीज कपातीमुळे पिके धोक्यात; संतप्त शेतकऱ्यांचा महावितरणवर धडक मोर्चा

Farm Loan Waiver: कर्जमाफीसाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक

SCROLL FOR NEXT