Agriculture Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Subsidy : शेतकऱ्यांनी ‘केवायसी’ करूनही अनुदान मिळेना

Subsidy Update : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार ‘केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करूनही जिल्ह्यातील ३० हजार ४०३ शेतकऱ्यांना अजून ५० कोटी ९१ लाख रुपये दुष्काळी अनुदान मिळालेले नाही.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्हा प्रशासनाच्या आवाहनानुसार ‘केवायसी’ची प्रक्रिया पूर्ण करूनही जिल्ह्यातील ३० हजार ४०३ शेतकऱ्यांना अजून ५० कोटी ९१ लाख रुपये दुष्काळी अनुदान मिळालेले नाही. या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर तातडीने अनुदान जमा करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

गेल्या वर्षीच्या खरिपात जिल्ह्यात अपुरा पाऊस झाल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सरकारने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्यातील ४० तालुक्यांमध्ये गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला होता.

यात जिल्ह्यातील लोहारा, वाशी व धाराशिव या तालुक्यांत दुष्काळ जाहीर करताना एक लाख ६४ हजार २५९ शेतकऱ्यांना २०८ कोटी ५९ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले. यात अनेकांनी ‘केवायसी’ केल्यानंतर लगेच अनुदान मिळाले. मात्र नऊ महिने उलटले तरी तीस हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही.

प्रशासनाच्या आवाहनानुसार, शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली तरी ३० हजार ४०३ शेतकऱ्यांना ५० कोटी ९१ लाख रुपये अनुदान त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. धाराशिव तालुक्यातील ९२ हजार १२९ शेतकऱ्यांपैकी ७५ हजार ६०१ शेतकऱ्यांना ८५ कोटी ४९ लाख रुपये वाटप झाले असून, अद्याप १६ हजार ५२८ शेतकऱ्यांना अनुदान मिळालेले नाही.

लोहारा तालुक्यातील ३४ हजार १९७ शेतकऱ्यांपैकी २७ हजार ६९ शेतकऱ्यांना ३७ कोटी १३ लाख रुपयांचे वाटप झाले असून, अजून सात हजार १२८ शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही तर वाशी तालुक्यातील ३७ हजार ९३३ शेतकऱ्यांपैकी ३१ हजार १८६ शेतकऱ्यांना ३४ कोटी ९६ लाख रुपये वाटप झाले असून, अद्यापही सहा हजार ७४७ शेतकऱ्यांना अनुदान मिळायचे राहिले आहे. याशिवाय प्रलंबित शेतकऱ्यांची संख्या सात हजार ९०७ इतकी असून, त्यांनाही केवायसीची सक्ती न करता अनुदान देण्याची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Reservation: न्यायालयाच्या नियमांचं पालन करा; जरांगे यांचं आंदोलकांना आवाहन

Qureshi Community Protest : कुरेशी समाजावरील अन्याय दूर करा

Onion Storage: कांदा साठवणीचे तंत्र, तज्ज्ञांचा सल्ला

Crop Damage Survey : पंचनामे बाजूला ठेवून तत्काळ मदत करा

Kharif Sowing : खरिपाच्या पेऱ्यात १५ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT