Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : चुकीच्या फेरफार नोंदीमुळे शेतकरी पीक कर्जापासून वंचित

Ferfar Entry : तलाठ्याने पीक कर्ज बोजाची चुकीची फेरफार नोंद तयार केल्याने फुपनगरी (ता. जळगाव) येथील एक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : तलाठ्याने पीक कर्ज बोजाची चुकीची फेरफार नोंद तयार केल्याने फुपनगरी (ता. जळगाव) येथील एक शेतकरी पीक कर्जापासून वंचित आहेत. मागील आठ ते १० दिवसांपासून संबंधित शेतकरी ही चुकीची फेरफार नोंद दुरुस्तीसंबंधी कानळदा तलाठी कार्यालयात चकरा मारीत आहे.

पण दखल घेतली जात नसल्याने संबंधित शेतकरी त्रस्त झाला आहे. फुपनगरी येथील एका शेतकऱ्याने जळगावातील राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे पीक कर्ज घेतले आहे. हे पीक कर्ज वितरण करण्यापूर्वी किंवा ते खात्यात जमा करण्यापूर्वी संबंधित बँकेने शेतकऱ्याला सात-बारा उताऱ्यावर पीक कर्ज घेतल्याचा बोजा चढविल्याची नोंद (नोटीस) आणा, असे सांगितले.

त्यासंबंधी बँकेने शेतकऱ्याकडे कागदपत्र दिले. ही कागदपत्र शेतकऱ्याने फुपनगरी (ता. जळगाव) येथील प्रभारी तलाठी यांच्याकडे दिली. तलाठ्याने मात्र पीककर्ज बोजा नोंद नमूद करताना गटाची चुकीची नोंद केली.

ही चूक शेतकऱ्याच्या लक्षात आल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने ही चूक सुधारण्याची विनवणी तलाठी यांना तोंडी स्वरूपात केली. त्यावर तलाठी यांनी ही चूक दुरुस्त होईल, असे सांगितले.

परंतु चार-पाच दिवस झाल्यानंतरही ही चुकीची नोंद दुरुस्त झालेली नसल्याचे लक्षात घेऊन शेतकरी पुन्हा संबंधित प्रभारी तलाठी यांच्याकडे कानळदा येथे गेला. नोंद दुरुस्तीसाठी अर्जही तलाठी यांच्याकडे सादर केला. पण यानंतरही कार्यवाही झाली नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT