Oilseed Agrowon
ॲग्रो विशेष

Oilseeds Sowing : तेलबियांची दोन हजार हेक्टरवर पेरणी

Rabi Season : यंदा रब्बी हंगामात तेलबिया पिकांमध्ये गळीत धान्य पिकांची सरासरीच्या चार हजार २५१ हेक्टरपैकी २ हजार ११५ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : तेलबिया म्हणून ओळख असलेल्या करडई, जवस, तीळ, सूर्यफूल पिकांकडे शेतकरी हळूहळू वळत आहे. यंदा रब्बी हंगामात तेलबिया पिकांमध्ये गळीत धान्य पिकांची सरासरीच्या चार हजार २५१ हेक्टरपैकी २ हजार ११५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरी ५० टक्के पेरणी झाली आहे. येत्या काळात या पिकांकडे आणखी वळविण्यासाठी कृषी विभागाला मोठी कसरत करावी लागणार आहे, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

सध्या पिकांची अवस्था चांगली असली तरी अनेक ठिकाणी पिके काढणीस तयार होत आहेत. पुढील महिन्यानंतर या पिकांची काढणी सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा थंडी असल्याने पिके जोमदार आली आहेत.

प्रामुख्याने तीन ते चार महिने कालावधी असलेल्या गळीत धान्य पिकांची अनेकांनी नोव्हेबरमध्ये पेरणी केली होती. येत्या काळात त्याची काढणी सुरू होणार आहे. त्यातच अधूनमधून बदललेल्या हवामानामुळे काही प्रमाणात मावा, तुडतुडे या किडींचाही पिकांवर प्रादुर्भाव होत आहे. त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये तेलबियाविषयी चांगलीच जनजागृती केली जात आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यात पेरणीच्या क्षेत्रात काही प्रमाणात वाढ होत आहे. नगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी, नेवासा, राहुरी, संगमनेर, राहाता या तालुक्यात कमीअधिक प्रमाणात तेलबिया पिकांची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरणी पाथर्डी तालुक्यात झाली आहे.

सरासरीच्या सुमारे १५३ हेक्टरपैकी १४७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. सरासरीच्या ९४ हेक्टरपैकी १०४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर हवेली, खेड, दौंड, शिरूर तालुक्यात तुरळक पेरणी झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा येथे सर्वाधिक पेरणी झाली आहे.

यामध्ये सरासरीच्या १७१३ हेक्टरपैकी १०७३ हेक्टर, अक्कलकोट तालुक्यात सरासरीच्या ७२८ हेक्टरपैकी २४१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर सांगोला तालुक्यात सरासरीच्या सात हेक्टरपैकी १८१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, माढा तालुक्यांतही कमीअधिक प्रमाणात पेरणी झाली आहे.

तेलबिया पिकांची झालेली पेरणी : हेक्टरमध्ये

जिल्हा सरासरी क्षेत्र पेरणी झालेले क्षेत्र टक्केवारी

नगर ४८६ ३८४ ७९

पुणे १९६ १२३ ६३

सोलापूर ३५६९ १६०९ ४५

एकूण ४२५१ २११५ ५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT