Shaktipith Highway Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway Protest: कोल्हापुरात शेतकऱ्यांचा जलसमाधीचा प्रयत्न

Farmers Protest: ‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द’ नारा देत कोल्हापूरातील हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १) पुणे-बंगळूर महामार्ग दोन तास रोखला आणि शक्तिपीठ महामार्गाविरोधात सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केले.

Team Agrowon

Kolhapur News: ‘एकच जिद्द शक्तिपीठ रद्द’ असा नारा देत जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १) सुमारे दोन तास पुणे- बंगळूर महामार्ग रोखून धरला.शक्तिपीठ महामार्गाविरोधात कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शक्तिपीठ विरोधी सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलन केले.

आंदोलन सुरू असताना काही संतप्त शेतकऱ्यांनी पुलावरून नदीत उडी मारत जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. सरकार आमच्या जमिनी काढून घेत असेल तर जगण्याला अर्थ नाही, असा क्लेष करीत शेतकऱ्यांनी नदीत उडी मारण्यासाठी पुलाकडे धाव घेतली. सरकार आमचं एकत नाही, आमचं भवितव्य खरे नाही, सरकार तात्पुरते पैसे देईल पण आयुष्यभर दुःख देईल, असे सांगत शेतकऱ्यांनी व्यथा मांडली.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी नेले. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राजू शेट्टी यांच्यासह ऋतुराज पाटील, माजी आमदार राजूबाबा आवळे, शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, रविकिरण इंगवले, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील, किसान काँग्रेसचे सागर कोंडेकर

कॉ. सतीशचंद्र कांबळे, प्रकाश पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी महामार्ग करण्याच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला. महामार्ग रद्द करण्यासाठी ४ जुलैला पंढरपूरच्या विठ्ठलाला साकडे घालण्याचे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी विविध नेत्यांनी दिला.

रिमझिम पावसाच्या सरीतही शेतकऱ्यांनी आंदोलन करून सरकारला असंतोष दाखवून दिला. महामार्गासाठी खर्च होणारा निधी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरला तर दोन वेळा शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. मात्र हे टक्केवारीच सरकार आहे. ठेकेदारांच्या हितासाठी शेतकऱ्यांवर हा महामार्ग लादला जात आहे. या विरोधात अनेक वक्त्यांनी टीकेची झोड उठविली.

आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील बागायती पट्याचे तर पूर्ण नुकसान होणार आहेच, पण भरावामुळे अगोदरच महापुराच्या छायेत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर भराव पडल्याने महापुराचा धोका आणखी गडद होणार आहे. महामार्गाविरोधातील आंदोलन तीव्र करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टींसह अन्य वक्त्यांनी दिला.

महामार्गामुळे समृद्धी नष्ट होणार असल्याने भविष्यातही हे आंदोलन तीव्र करू असे विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या सोबत सामान्य नागरिक ही शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणार आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार व्यक्त झाला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solar Pump Complaint : आता महावितरणच्या अॅपवर शेतकऱ्यांना सौर कृषी पंपाची तक्रार करता येणार

Monsoon Rain: शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज कायम

Rain Crop Damage : मॉन्सूनपूर्व पावसामुळे पिके, फळबागांचे २१ कोटींचे नुकसान

Irrigation Management : शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोेचले तरच प्रकल्पांचा उपयोग

Water Storage Marathwada : मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा ७९ टीएमसीवर

SCROLL FOR NEXT