Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : कुठे वापसा तर कुठे अजून पावसाची प्रतीक्षा

Rain Update : लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. उर्वरित दहा तालुक्यात १०० ते २१९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला तरी काही तालुक्यात दररोज पाऊस पडत आहे.

Team Agrowon

Latur / Dharashiv News : दोन्ही जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली तरी काही भागात दररोज पाऊस पडत असून वापसा होत नसल्याने पेरण्यांसाठी शेतकऱ्यांना अजून हालचाल करता येत नाही तर काही भागात अजूनही पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.

यामुळे पेरण्यांचा वेग मंदावला असून पावसाने उघडीप दिली तर वेग वाढेल, अशी आशा आहे. यात काही भागात कापूस पेरणी सुरू असून पाऊस थांबला तर आठवड्यात दोन्ही जिल्ह्यात पेरणीचा टक्का वाढू शकतो.

लातूर जिल्ह्यात जळकोट तालुक्यात अजूनही दमदार पाऊस झालेला नाही. उर्वरित दहा तालुक्यात १०० ते २१९ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला तरी काही तालुक्यात दररोज पाऊस पडत आहे.

यामुळे आधी पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती तर आता पेरणीसाठी वापसा होण्याची वाट शेतकरी पहात आहेत. पेरणीसाठी आवश्यक बियाणे व खतांची खरेदी झाली असून आता वापसा झाला की पेरणीची तयारी शेतकऱ्यांनी ठेवली आहे. जळकोट तालुक्यात काही भागात कापूस पेरणी सुरू आहे तर काही भागात पुरेशी ओल झालेली नाही.

उर्वरित दहा तालुक्यात उघडीप दिलेल्या भागात पेरण्या वेगाने सुरू आहेत तर काही भागात दररोज पाऊस येत असल्याने वापसाअभावी पेरण्या खोळबंल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव यांनी सांगितले. धाराशिव जिल्ह्यात सर्व तालुक्यात दमदार पाऊस झाला असून पेरण्या वेगाने सुरू आहेत. जिल्ह्यात पाच लाख चार हजार ७३५ हेक्टवर खरीपाच्या पेरण्या होणार असून या आठवड्यात पेरण्याचा टक्का वाढणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविंद्र माने यांनी सांगितले.

दोन्ही जिल्ह्यातील पाऊस आणि पेरणी स्थिती अशी...

लातूर जिल्ह्यात एक ते १४ जून दरम्यान २४९.७० मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरी पावसाच्या २० टक्के आहे. तर धाराशिव जिल्ह्यात २८५.२० मिलीमीटर पाऊस झाला असून तो सरासरी पावसाच्या २५ टक्के आहे. जिल्ह्यात १४ जूनअखेर तीन हजार ९८४ तर लातूर जिल्ह्यात चार हजार ५४५ हेक्टरवर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT