Onion Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : नगर जिल्ह्यात कांदादर पडल्याने शेतकऱ्यांचा संताप

Onion Market : दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी (ता. ९) खरेदीदारांकडून कांद्याचे दर पाडल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली.

Team Agrowon

Nagar News : दादा पाटील शेळके नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी (ता. ९) खरेदीदारांकडून कांद्याचे दर पाडल्यानंतर संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलन करत घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा संताप पाहून पुन्हा दरात वाढ केली गेली. त्यामुळे व्यापारी कांदा खरेदीबाबत दिशाभूल करीत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. संगमनेर, घोडेगाव, पारनेर येथेही दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी कांदा दराबाबत संताप व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारने ४ मे रोजी कांदा निर्यातीवरील बंदी हटवल्याचे जाहीर केले. त्यानंतर संपूर्ण राज्यात कांद्याच्या दरात वाढ झाली. दरवाढ झाल्याचे दिसताच शेतकऱ्यांनी बाजारात कांदा विक्रीला आणायला सुरुवात केली. नगरला सोमवारी (ता. ६) झालेल्या लिलावाला विक्रमी १ लाख ३७ हजार २५८ गोण्या कांद्याची आवक झाली.

त्या दिवशी एक नंबर कांद्याला २१०० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला. त्यामुळे गुरुवारी (ता. ९) शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता. मात्र लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे दर पडल्याचे दिसले. सोमवारच्या तुलनेत प्रति क्विंटल १ हजार ते बाराशे रुपयांनी दर कमी मिळत असल्याचे दिसताच उपस्थित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत घोषणाबाजी सुरू केली.

शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतल्यानंतर पुन्हा लिलावात १२०० रुपयांवरून दर १७०० रुपयांपर्यंत गेले. त्यामुळे या मागील नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत होते. त्यानंतर तालुक्यातील नेत्यांनी येथे येऊन शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. शेतकरी प्रतिनिधींनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात जाऊन निवेदन दिले, व दर कसे काय पाडले याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.

सत्ताधारी, अडत- व्यापाऱ्यांचे संगनमत

लोकसभा निवडणुकीच्या काळात सरकारने कांदा निर्यात बंदी उठवली. केंद्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहे. दोन दिवसांपूर्वी २१०० रुपये भाव मिळालेला असताना अचानक ८०० ते ९०० रुपयांवर दर येतोच कसा, यामध्ये अडते- व्यापारी लॉबिंग करत असून सत्ताधारी आणि अडत-व्यापाऱ्यांचे मिलीभगत असल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला असून, चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Relief: शेतकऱ्यांच्या खात्यात ५ हजार जमा होण्यास सुरुवात, जयकुमार गोरेंची माहिती

Nagpur Agriculture : नागपुरात कृषी विभागाचा कारभार रामभरोसे; पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीला ब्रेक!

Karjmafi Glitches : शेतकऱ्यांची कोंडी: सरकारच्या तांत्रिक चक्रव्यूहात अखेरची कर्जमुक्ती योजना अडकली!

November Rain: नोव्हेंबरमध्ये एमजेओमुळे पावसाचे प्रमाण वाढणार आहे का ?

Scheme Glitches : सातारा जिल्ह्यात शासकीय योजनांच्या त्रुटींचा जाच; लाभाऐवजी शेतकऱ्यांनाच सहन करावा लागतोय मनस्ताप!

SCROLL FOR NEXT