Onion Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : निर्यातबंदी मागे घ्या; नाहीतर गाठ आमच्याशी

Onion Market Update :दुष्काळी स्थितीत कांदा पीक जगविले. काढणीला आला तर गारपिटीने नुकसान केले.

मुकूंद पिंगळे

Nashik News : दुष्काळी स्थितीत कांदा पीक जगविले. काढणीला आला तर गारपिटीने नुकसान केले. अशा परिस्थितीत दोन पैसे मिळत होते, मात्र केंद्र सरकारने पुन्हा राजकारणासाठी शेतकऱ्यांचा घात केला. त्यामुळे ही निर्यातबंदी मागे घ्या; नाहीतर २०२४ च्या निवडणुकीमध्ये गाठ आमच्याशी आहे, असा इशारा कांदा उत्पादकांनी दिला.

कांदा निर्यातबंदी विरोधात प्रहार शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाध्यक्ष गणेश निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरावर डेरा आंदोलन पुकारले होते. त्यानुसार रविवारी (ता.१०) चांदवड, देवळा, कळवण, सटाणा, येवला, नांदगाव तालुक्यांतील शेकडो कार्यकर्ते व शेतकरी नाशिकला आले.

पोलिसांनी आंदोलकांना अशोकस्तंभ परिसरात अडविले. त्यावेळी कार्यकर्ते संतापले. केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. कांद्याच्या माळा गळ्यात घालून ‘निर्यातबंदी मागे घ्या’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. अखेर डॉ. पवार यांच्याशी निंबाळकर यांचे फोनवरून बोलणे झाले.

‘‘मी तुमच्या मुद्द्यासाठी आग्रही असून निर्यातबंदी मागे घेण्यासाठी प्रयत्न करत आहे. यावर लवकर तोडगा निघेल हा तुम्हाला शब्द देते,’’ असे आश्वासन त्यांनी दिले. त्यांनतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिला. या ठिकाणी जिल्हा उपनिबंधकांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

प्रमुख मागण्या...

- २५ टक्के अग्रिम पीकविमा व पीक कापणी प्रयोगाद्वारे संपूर्ण परतावा द्या

- दुष्काळ व गारपिटीचे अनुदान एकरकमी अदा करावे

- नाफेडची कांदा खरेदी रद्द करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT