Shetkari Sanman Nidhi Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Scheme : ‘शेतकरी सन्मान योजना’ आता बाह्य यंत्रणेकडून राबविणार

Shetkari Sanman Nidhi Yojana : कृषी विभाग राबवीत असलेली पंतप्रधान शेतकरी सन्‍मान निधी योजना आता बाह्य यंत्रणांच्‍या माध्यमातून राबविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Amravati News : कृषी विभाग राबवीत असलेली पंतप्रधान शेतकरी सन्‍मान निधी योजना आता बाह्य यंत्रणांच्‍या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. या योजनेच्‍या कामासाठी ४११ मनुष्‍यबळाच्‍या सेवा बाह्ययंत्रणेच्‍या माध्‍यमातून करून घेण्‍याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शुक्रवारी या संदर्भात शासन निर्णय जाहीर झाला.

पंतप्रधान शेतकरी सन्‍मान निधी ही केंद्र पुरस्‍कृत योजना आहे. योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना २ हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात दर वर्षी ६ हजार रुपये लाभ देण्यात येतो. या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी ६ हजार रुपये इतक्या निधीची भर घालणारी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ ही योजना देखील राबविण्‍यात येत आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे केंद्र शासनास पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्राकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो. किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने, स्वयंनोंदणीकृत लाभार्थींना मान्यता प्रदान करणे, पोर्टलवरील विविध दुरुस्त्यांअभावी लाभापासून वंचित लाभार्थी ई-केवायसी प्रमाणीकरण, बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे,

लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे, चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे, मृत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे, वारशाची नव्याने नोंदणी करणे, स्वयंनोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणीअंती मान्यता प्रदान करणे-नाकारणे याबाबी प्रलंबित असल्याने, केंद्र शासनाने वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.

या दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ४११ मनुष्यबळाच्या सेवा बाह्ययंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्‍यता देण्‍यात आली आहे. यात मंत्रालयातील अवर सचिवांच्‍या कक्षात ४, पुणे येथील कृषी आयुक्‍तालयातील योजना अंमलबजावणी कक्षात १७, जिल्‍हा अधीक्षक कृषी कार्यालयांत ३४ आणि तालुका नोडल अधिकारी ३५५ अशी ४११ पदे आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage: अहिल्यानगर जिल्ह्यात महिनाभरात ३० हजार हेक्टरवरील पिके बाधीत

Urea Stock: चंद्रपूर जिल्ह्यात युरियाचा वीस हजार टन साठा शिल्लक

Well Repair Subsidy: अर्धापूरच्या १०२ शेतकऱ्यांना मिळणार विहीर दुरुस्तीचे अनुदान

Alphanso Mango Crisis: हापूस आंब्याचा हंगाम संकटात

Gas Theft Case: गॅस चोरीप्रकरणी १.२६ कोटींच्या मुद्देमालासह दोन मोठे टँकर जप्त

SCROLL FOR NEXT