Gas Smuggling: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील खोजेवाडी शिवार परिसरात गॅस चोरीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले आहे. यात १ कोटी २६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती नियंत्रक शिधावाटप व राज्यस्तरीय दक्षता पथकाने दिली आहे..राज्यातील इंधन चोरी व अवैध साठेबाजीविरोधात ‘झीरो टॉलरन्स’ धोरण अवलंबत राज्यस्तरीय दक्षता पथकाने ही कारवाई केली. नियंत्रक शिधावाटप चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने वैजापूर रोडवरील हॉटेल साईयशजवळील मोकळ्या जागेत सापळा रचला. २ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास एचपी कंपनीच्या एलपीजी टँकरचे सील तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅसची चोरी सुरू असताना पथकाने धाड टाकत दोन संशयितांना ताब्यात घेतले..LPG Gas Shortage: सरपणासाठी महिलांची भटकंती.या कारवाईत MH 43 K 5921 व MH 43 CK 5747 क्रमांकाचे दोन टँकर (एकूण ३५ हजार २२० किलो गॅस) तसेच व्यावसायिक (१९.२ किलो) व घरगुती (१४.२ किलो) असे मिळून २६ सिलिंडरांचा अवैध साठा जप्त करण्यात आला. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे १ कोटी २६ लाख रुपये आहे. .या कारवाईचे गांभीर्य अधोरेखित करताना, जप्त केलेला गॅससाठा तब्बल २,४८० गरीब कुटुंबांची महिनाभराची गरज भागवू शकला असता, असे नमूद करण्यात आले. गॅस माफिया स्वतःच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांच्या हक्काच्या इंधनाचा काळाबाजार करत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे..LPG Gas Cylinder Delivery: ग्राहकांना गॅस वितरण घरपोच करावे: जिल्हाधिकारी स्वामी.या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, या रॅकेटचे धागेदोरे किती दूरवर पसरले आहेत, याचा सखोल तपास पोलिस यंत्रणेमार्फत सुरू आहे..अवैध साठेबाजी आणि जीवनावश्यक वस्तूंची चोरी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल.चंद्रकांत डांगे, राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.