Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : कुरुल शाखेतून अखेरीस सीना नदीत पाणी सोडले

Ujani Dam Water : जलसंपदा विभागाने यापूर्वी १२ मे रोजी सीना नदीत पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन नदीकाठच्या आंदोलनकर्त्यांना दिले होते.

Team Agrowon

Solapur News : दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी ठिय्या आंदोलन केल्यानंतर अखेरीस उजनी धरणातील पाणी कुरुल शाखा कालव्यातून बुधवारी (ता.१४) सायंकाळी सीना नदीत सोडण्यात आले.

जलसंपदा विभागाने यापूर्वी १२ मे रोजी सीना नदीत पाणी सोडण्यात येईल, असे लेखी आश्‍वासन नदीकाठच्या आंदोलनकर्त्यांना दिले होते. मात्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिक्षक अभियंता एस. एस. खांडेकर यांनी उजनी धरणातील पाणीपातळी घटल्याने सीना नदीत पाणी सोडण्याबाबत असमर्थता दाखवली होती.

ठरलेल्या वेळेत पाणी न सोडल्याने मंगळवारी (ता.१३) आमदार देशमुख यांनी शेतकऱ्यांसह सिंचन भवनासमोर ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत पाणी सोडणार नाही, तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेतली.

प्रशासन जुमानत नसल्याने त्यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशीही थेट बोलणी करून या विषयावर लक्ष वेधले होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना सूचना दिल्या.

त्यानंतर त्यांनी पुन्हा अधीक्षक अभियंता खांडेकर यांच्याशी चर्चा केली. शेवटी पाणी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार कुरुल शाखा कालव्यातून पाणी सोडण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे या तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Farming: डाळिंबाचा रंग, आकार, दर्जा उत्तम राखण्यावर भर

Dhananjay Munde: कृषी खात्यात आणखी एक मोठा घोटाळा? धनंजय मुंडे यांच्यावर १६९ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Dharashiv Logistics Park: सरकारने प्रस्ताव दिल्यास कौडगावला लॉजिस्टिक पार्क

Maize Weed Management: मक्यातील वाढत्या तणाचा करा सोप्या पद्धतीने बंदोबस्त!

Agrowon Podcast: सिताफळाला चांगला दर; फ्लॉवरला उठाव; भेंडीची आवक घटली, कारली दरावर स्थिरता, मका कणीस तेजीत!

SCROLL FOR NEXT