Kisan Morcha  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Protest : दिल्लीच्या सिमांवरच शेतकऱ्यांना अडवले

हमीभाव, अजय मिश्रा यांच्या अडकेच्या मागणीसाठी महापंचायतीची हाक Sanyukt kisan Morcha

Team Agrowon

पुणेः आपल्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथील जंतर मंतर (Jantar-Mantar) येथे संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukt Kisan Morcha) महापंचायतीचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी शेतकरी नेते आणि शेतकऱ्यांना दिल्लीच्या सिमांवर अडवले. तर राकेश टिकैत यांना ताब्यात घेण्यात आले.

हमीभावाची (MSP) कायद्याने शाश्वती, लखीमपूर खेरी येथील पिडीतांना न्याय आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांच्या अटकेच्या मागणीसाठी संयुक्त किसान मोर्चाने आज दिल्ली येथील जंतरमंतरवर महापंचायतीचीची हाक दिली होती.

आज होणाऱ्या या महापंचायतीसाठी (Mahapanchayat) विविध राज्यातून शेतकरी दिल्लीकडे रवानाही झाले. मात्र पोलिसांनी शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवरच अडविले. त्यामुळे दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आणि पोलिसांमध्ये तणाव पाहायला मिळाला. पोलिसांनी दिल्लीच्या सर्व सीमांवर कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता. वरिष्ठ अधिकारी दिवसभर परिस्थितीची माहिती घेत होते.

संयुक्त किसान मोर्चाने महापंचायतीची हाक दिल्यानंतर पोलिसांनी नवी दिल्ली परिसरात कलम १४४ लागू केले. जंतरमंतर येथे मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला. शेतकऱ्यांचा रस्ता अडविण्यासाठी अनेक ठिकाणी सीमेंटचे ब्लाॅकही लावण्यात आले.

बाहेरील राज्यातून दिल्लीत दाखल होणाऱ्या सीमांवर सिंघू आणि टिकरी (Singhu And Tikari) सीमांवरही मोठा पोलिस बंदोबस्त होता. पोलिसांनी दिल्ली आणि हरियानाच्या सीमेवरही बॅरिकेड्स लावले होते. तर गाझीपूर सीमेवरही पोलिसांनी शेतकऱ्यांना रोखले.

संयुक्त किसान मोर्चाने महापंचात करण्याचे जाहीर केल्यानंतर पोलिसांनी संयुक्त किसान मोर्चाचे नेते राकेश टिकैत यांना रविवारीच अटक केली. जंतर मंतर येथे रविवारी काही शेतकरी नेते आणि संघटनांनी रोजगार संसदेचे आयोजन केले होते.

या संसदेला जात असतानाच दिल्ली पोलिसांनी राकेश टिकैत यांनी सीमेवरच अडवले आणि ताब्यात घेतले. पोलीस केंद्र सरकारच्या सांगण्यावरून दडपशाही करत असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी यावेळी केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chinese Raisin : चीनच्या बेदाण्याची शेतकऱ्यांना मोठी झळ

Rain Alert Maharashtra : विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता

Kharif Sowing : नांदेडला ज्वारी, उडीद, मुगाच्या पेरणीत यंदाही घट

Solar Power : सांगली जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये होतेय सौर ऊर्जेवर वीजनिर्मिती

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात १४ हजार हेक्टरवर उसाची लागवड

SCROLL FOR NEXT