Edible Oil Agrowon
ॲग्रो विशेष

Edible Oil Mission : खाद्यतेल अभियानात सोयाबीन, करडईसाठी हिंगोलीची निवड

Oilseed Crop : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत २०२५-२६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Hingoli News : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत २०२५-२६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी वार्षिक कृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. या अभियानांतर्गत सोयाबीन, करडई या पिकांसाठी हिंगोली जिल्ह्याची निवड केली आहे.

अंतर्गंत मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा घटक राबवायचे आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांनी बुधवार (ता. ३०) पूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.

याबाबत नवीन कार्यकारी सूचना केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध झाल्या आहेत. अभियानाच्या अंमलबजावणीमध्ये पीकनिहाय मूल्य साखळी समूह निवडणे, मूल्य साखळी भागीदार म्हणून शेतकरी उत्पादक कंपनीची निवड करणे, तांत्रिक साहाय्य संस्था म्हणून कृषी विज्ञान केंद्राची निवड, मूलभूत बियाणे खरेदी (१०० टक्के केंद्र हिस्सा), समुहामध्ये प्रमाणित बियाणे वितरण, शेतकरी प्रशिक्षण, शेतकरी शेतीशाळा व मूल्य साखळी भागीदार यांना व्यवस्थापन खर्च, मूल्य साखळी समुहामधील शेतकऱ्यांचे माती परिक्षण, सीड हब, ब्लॉक प्रात्यक्षिके, काढणीत्तोर सुविधा सहाय्य, कृषी मॅपरवर लाभार्थ्यांची माहिती भरणे आदी घटकांचा समावेश करण्यात आला आहे.

मूल्य साखळी भागीदार यांच्यामार्फत समूहामध्ये प्रमाणित बियाणे शेतकरी प्रशिक्षण व शेतकरी शेतीशाळा आदी घटक राबवायचे आहेत. त्यानुषंगाने कंपनी कायदा किंवा सहकारी कायद्यांतर्गत नोंदणी केलेली. जिल्ह्यात काम करण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव असलेली.

किमान २०० शेतकरी नोंदणीकृत असललेल्या शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच तीन वर्षातील सरासरी वार्षिक उलाढाल ९ लाख रुपयांपेक्षा जास्त असावी. शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये शेतकऱ्यांचा किमान ३ लाख रुपयांचा समभाग असावा. शेतकरी उत्पादक कंपनी सहकारी संस्था प्राधान्याने कमी उत्पादकता असणाऱ्या तालुक्यांमध्ये कार्यरत असावी.

सरकारकडून अनुदान प्राप्तकर्ता शेतकरी उत्पादक संघाला प्राधान्य दिले जाईल. १० हजार रुपये शेतकरी उत्पादक संघ योजनेंतर्गत तयार केलेले शेतकरी उत्पादक कंपनी, नाफेड, एनएससी-ओएस इत्यादी सार्वजनिक संस्थांकडे नोंदणीकृत तेलबियांशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपनी यांना पात्रता निकषांच्या पूर्ततेच्या अधीन राहून प्राधान्य दिले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT