Cashew Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farming : शेतकरी नियोजन ः काजू

Cashew Crop : खांबाळे (ता. वैभववाडी) येथे विठोबा धाकू सुतार यांची १० एकर जमीन आहे. त्यापैकी ३ एकरांत त्यांनी २०० काजूची झाडे लागवड केली आहे. यामध्ये वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला-७ जातीची लागवड आहे.

Team Agrowon

शेतकरी ः विठोबा धाकू सुतार
गाव ः खांबाळे, ता. वैभववाडी, जि. सिंधुदुर्ग
एकूण क्षेत्र ः १० एकर
काजू लागवड ः ३ एकर (२०० झाडे)


Cashew Management : खांबाळे (ता. वैभववाडी) येथे विठोबा धाकू सुतार यांची १० एकर जमीन आहे. त्यापैकी ३ एकरांत त्यांनी २०० काजूची झाडे लागवड केली आहे. यामध्ये वेंगुर्ला ४ आणि वेंगुर्ला-७ जातीची लागवड आहे.

या वर्षीचे नियोजन ः
- यावर्षीचा हंगाम एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत सुरू होता. हंगाम संपल्यानंतर मे महिन्यात झाडांखाली पडलेला पालापाचोळा एकत्र करून तो झाडांच्या बुंध्यावर रचून घेतला. पालापाचोळा झाड्याच्या बुंध्यात रचल्यामुळे तणांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच त्याचा झाडांना देखील चांगला फायदा होतो.
- यावर्षी मॉन्सूनचा पाऊस राज्यात उशिराने दाखल झाला. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत यंदा काजू पिकाच्या नियोजनात देखील बदल करावा लागला.

दरवर्षी साधारणपणे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात झाडांना मिश्रखते आणि शेणखताची मात्रा देतो. झाडाच्या उंची आणि विस्ताराप्रमाणे खताची मात्रा दिली जाते. परंतु यावर्षी जून महिन्यामध्ये अपेक्षित पाऊस झाला नाही. पुढे संपूर्ण जुलै महिना मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात प्रति झाड ५ किलो शेणखत आणि २ किलो रासायनिक खतांचे डोस दिले.

- जुलै महिन्यात यावर्षी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे या महिन्यात बागेत कामे करणे शक्य झाले नाही. पावसामुळे बागेत तणांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला होता. मागील काही दिवसांपासून पावसात उघडीप आहे. बागेत वाढलेले तण ग्रासकटरने या आठवड्यात काढण्याचे नियोजन आहे. तण काढून झाल्यानंतर संपूर्ण बागेची स्वच्छता केली जाईल. त्यासाठी साधारण पाच ते सहा दिवस लागतील.

कापलेले तण जागेवरच कुजण्यासाठी ठेवले जाते. पावसाच्या एक दोन सरी पडल्यानंतर या तणामध्ये कुजण्याची प्रक्रिया सुरु होते. त्याचा झाडांना चांगला फायदा होतो.
- याशिवाय बागेत वाढलेली छोटी झुडुपे तोडण्याचे काम देखील केले जाईल. कापलेले झुडुपांचा सर्व पाला झाडांच्या बुंध्यात टाकला जातो. ते देखील कुजून त्याचा झाडांना फायदा होतो.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आगामी नियोजन ः
- सध्या झाडांना पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. पुढील आठ ते दहा दिवसांत बागेतील सर्व झाडांना पालवी येईल. सुरुवातीला वेंगुर्ला चार जातीच्या झाडांना पालवी येण्यास सुरुवात होते. त्यानंतर इतर झाडांना पालवी येते.
- पालवी येण्यास सुरुवात झाल्यानंतर बागेत टी मॉस्किटो बगचा प्रादुर्भाव हमखास जाणवतो. त्यासाठी सर्व झाडांना पालवी येण्यास सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण बागेची पाहणी करून आवश्यकतेनुसार ८ ते १० दिवसांत रासायनिक कीटकनाशकांची एक फवारणी घेतली जाईल.


- नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात काजू झाडांना मोहोर फुटण्यास प्रारंभ होतो. मोहोर येण्याच्या काळात थ्रीप्सचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्यासाठी संपूर्ण बागेचे निरीक्षण करून आवश्यकतेनुसार पुन्हा एकदा रासायनिक कीटनाशकांची फवारणी घेतली जाईल.

काढणी आणि उत्पादन ः
- दरवर्षी साधारण जानेवारीच्या अखेरीस ते फेब्रुवारी महिन्यापासून काजू हंगामाला सुरुवात होते. यावर्षीचा हंगाम फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू झाला होता. साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत काजू हंगाम सुरु राहिला होता.


- हंगाम सुरु झाल्यानंतर झाडावरून पडलेले काजू बी गोळा करण्याचे काम सुरु झाले. एक दोन दिवसाआड काजू बी गोळा करण्याचे काम सुरु होते. साधारण आठवडाभर काजू बी गोळा करण्याचे काम सुरु होते.
- काजू बी एकत्र करून स्वच्छ धुवून त्यास कोवळे उन्ह देऊन घेतले. मोठा साठा झाल्यावर गोळा केलेल्या काजू बीची विक्री केली जाते.

- विठोबा सुतार, ९४२३३००४७०

(शब्दांकन ः एकनाथ पवार)


ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT