Bidri Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bidri Factory : बिद्री कारखान्यासाठी सभासद रस्त्यावर, भाजप, मुख्यमंत्र्यासह आबीटकरांवर टीका

Protest Bidri factory : बिद्री कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील शेतकरी सभासदांनी करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.

sandeep Shirguppe

Farmer Members Protest Bidry Factory : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ करवीर तालुक्यातील शेतकरी सभासदांनी करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली.

भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर सभासद शेतकऱ्यांनी घणाघाती टीका केली. पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात येत असल्याचे सभासदांनी स्पष्ट केले.

टी. वाय. पाटील म्हणाले, ‘कारखान्याचे काम लोकशाही प्रक्रियेनुसार चालते. त्याच्या सभासद संख्येचा आकडाही मोठा आहे. त्याचे कामकाजही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. तरीही काही विघ्नसंतोषी लोकांनी बिद्री डिस्टलरी प्रकल्पाला विरोध केला आहे.’

प्रा. श्रीनिवास पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांना हाताशी धरून आबिटकरांनी हे का केले? त्यांना सभासद जागा दाखविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत.’ किरणसिंह पाटील म्हणाले, ‘कारखाना सगळ्यांनी मोडला आहे. शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्‍याचे काम केले आहे. यापुढे शेतकऱ्यांच्या ताटात पाणी ओतण्याचा प्रयत्न कराल तर त्याला प्रत्त्युतर दिले जाईल.’

यावेळी प्रा. डॉ. अजित सूर्यवंशी, पांडुरंग पाटील, जयंत घाटगे यांची भाषणे झाली. निदर्शनात अशोक पाटील, अशोक किल्लेदार, श्रीपती पाटील, सागर पाटील, नामदेव मांडवकर, दत्तात्रय पाटील, भीमराव पाटील, अमर पाटील, कृष्णात पाटील, एस. के. पाटील, सुयोग वाडकर सहभागी झाले होते.

फलकांनी वेधले लक्ष

निदर्शनात आमचा दर भारी, आमचा कारभार भारी, बिद्रीचा शेतकरी लय सुखी, पन्नास खोके एकदम ओके, शेतकऱ्यांच्या १३५ कोटींच्या इथेनॉलला ठोकले टाळे, गद्दारीचा गतिमान प्रकाश, गुवाहाटीच्या कामाख्यदेवीला विनंती.. यासह अन्य फलकांनी लक्ष वेधले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT