Farmer Loan Waive Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Loan Waive : शेतकरी कर्जमाफीची फाइल मुख्यमंत्र्यांकडे

Agriculture Loan waive Scheme : महाऑनलाइन कंपनी बंद होऊन महाआयटी सुरू झाल्याने तपशील मिळत नसल्याचे कारण आयटी विभाग सांगत आहे. त्यामुळे हे कारण पुरेसे नसल्याचा आक्षेप सहकार विभागाने घेतला आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : तत्कालीन भाजप आणि शिवसेना सरकारच्या कालावधीत २०१७ मध्ये राबविण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेतील उर्वरित सहा लाखांवर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तपशील महाआयटीला खटपट करूनही मिळत नाही. त्यामुळे आता सभागृहात घोषणा केल्यामुळे त्यातून तुम्ही मार्ग काढावा, अशी विनंती करत सहकार विभागाने मुख्यमंत्री कार्यालयात फाइल दिली आहे.

महाऑनलाइन कंपनी बंद होऊन महाआयटी सुरू झाल्याने तपशील मिळत नसल्याचे कारण आयटी विभाग सांगत आहे. त्यामुळे हे कारण पुरेसे नसल्याचा आक्षेप सहकार विभागाने घेतला आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना राबविण्यात आली. ही योजना त्या वेळी ‘महाऑनलाइन’ने तयार केलेल्या पोर्टलद्वारे राबविण्यात आली होती.

त्यामुळे आतासुद्धा उर्वरित शेतकऱ्यांसाठी ही योजना त्या पोर्टलद्वारेच राबविणे अपेक्षित आहे. किंबहुना, त्या पोर्टलवर शेतकऱ्यांचा संपूर्ण डाटा आहे. मात्र ‘महाऑनलाइन’ बंद होऊन ‘महाआयटी’ सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे ‘महाऑनलाइन’चा डाटा आपण पुनर्स्थापित करू शकत नाही, असे पत्र आयटी विभागाच्या प्रधान सचिवांनी सहकार विभागाला दिले आहे. मात्र अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात एका व्यवस्थेवरील माहिती दुसऱ्या व्यवस्थेत घेणे शक्य आहे. त्यामुळे ‘महाआयटी’चे कारण तकलादू असल्याचा दावा सहकार विभागाने केला आहे.

सहकार विभाग कर्जमाफीसाठी प्रयत्न करत असताना ‘महाआयटी’ने दिलेल्या पत्रामुळे पुढील प्रक्रिया अडली आहे. त्यामुळे यातून आता मुख्यमंत्री कार्यालयानेच मार्ग काढावा, अशी विनंती करत सहकार विभागाने तयार केलेली फाइल पाठविण्यात आली आहे. आता अधिवेशनापूर्वी यावर मार्ग निघावा, अशी अपेक्षा सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना

- ३० जून, २०१६ पर्यंत थकित असलेली मुद्दल आणि व्याजासहित दीड लाख मर्यादेपर्यंत कर्ज माफ.

- दीड लाखापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी एखवेळ समझोता म्हणून दीड लाखाचा लाभ.

- २०१५-१६ मधील कर्जपरफेडीच्या २४ टक्के किंवा २५ हजार रुपयांपैकी कमी असलेली रक्कम प्रोत्साहन अनुदान

- प्रोत्साहन रकमेसाठी ८९ लाख शेतकरी पात्र

- प्रोत्साहन योजनेसाठी ३४.०२२ कोटी रुपयांची तरतूद

- १.२९ लाख कर्जखात्यांची १६४४ कोटी, तर एकरकमी परतफेड आणि २ लाख ९४ हजार कर्जखात्यांची ३९८५ कोटी रुपयांची कर्जमाफी शिल्लक

- प्रोत्साहन योजनेतील २.३३ लाख कर्जखात्यांचे ३४६ कोटी शिल्लक

- ६ लाख ५६ हजार कर्जखाती कर्जमाफीपासून वंचित

- ५ हजार ९७५ कोटींची कर्जमाफी प्रतीक्षेत

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT