Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : तूर्तास अन्नत्याग आंदोलन स्थगित; पण १२ सप्टेंबरला आक्रमक पवित्रा घेऊ, तुपकरांचा सरकारला इशारा

Ravikant Tupkar Protest : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळण्याबरोबरच इतर मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. पण आता राज्य सरकारने त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले असून शेतकऱ्यांचे प्रश्नावर चर्चा करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविम्यासह इतर विविध मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शनिवारी (ता. ७) सायंकाळी स्थगित केलं आहे. राज्य सरकारने आंदोलनाची दखल घेऊन ११ तारखेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर बैठक नियोजित केली आहे. त्यामुळे तुपकरांनी आपले आंदोलन तुर्तास थांबवल्याचे शनिवारी (ता.७) जाहीर केले.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी, सिंदखेडा येथील माँसाहेब जिजाऊ यांच्या राजवाड्यासमोर शेकडो कार्यकर्त्यांसह तुपकर ४ सप्टेंबरपासून आंदोलनावर बसले होते. सोयाबीन-कापूस दरवाढ, पिकविमा, अतिवृष्टीची १००% नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड, यासह विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलन सुरू केले होते. तर तुपकरांनी आंदोलन मागे घ्यावे, यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील व कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मध्यस्थी केली. तर सध्या त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

१२ सप्टेंबर पासून पुन्हा रस्त्यावर उतरू

शासनाने या आंदोलनाची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागण्यासंदर्भात ११ सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक बोलावली आहे. यादिवशी संबंधित विभागाचे मंत्री अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी तुपकर यांना दिले. तसेच हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती अधिकाऱ्यांसह शेतकरी व सहकाऱ्यांनी केल्यानंतर तुपकर यांनी तुर्तास आंदोलन मागे घेतले आहे. तसेच बैठकीत काय निर्णय होतो हे पाहून पुढील दिशा ठरवू. जर ठोस निर्णय झाले नाही तर १२ सप्टेंबर पासून राज्यभर आक्रमकपणे पुन्हा रस्त्यावर उतरू, असा तुपकर यांनी इशारा सरकारला दिला आहे.

विविध गावांमध्ये ठराव

तुपकर यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला आता जिल्ह्यातल्या शेकडो गावं आणि शेतकऱ्यांचा पाठिंबा वाढत आहे. तर विविध गावांमध्ये शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे ठराव घेतले जात आहेत. दरम्यान आंदोलनाच्या चौथ्या दिवस तुपकरांची प्रकृती खालावली असतांनाही सरकारकडून कोणतीच हालचाल न झाल्याने कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. तसेच रविवारी (ता.८) रास्तारोको आंदोलनाची हाक देण्यात आली होती. यावेळी परिस्थिती अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान शनिवारी सायंकाळी शासनाच्या वतीने उपविभागीय अधिकारी प्रा. खडसे यांनी तुपकरांची भेट घेऊन चर्चा केली. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आंदोलनाची दखल घेतली असून शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक बोलावल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे आपला उद्देश : तुपकर

यावेळी, शासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी आणि निर्णय घेण्यासाठी स्वतंत्र बैठक बोलावली गेली आहे. हे आपल्या आंदोलनाचे आणि शेतकऱ्यांच्या एकजुटीचे यश आहे. केवळ आंदोलन करणे आणि कायदा हाती घेणे हा आपला उद्देश नसून शेतकऱ्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देणे हा आपला उद्देश असल्याने तुपकर यांनी यावेळी म्हटले आहे.

राज्य सरकारकडून बैठकीचे निमंत्रण आले आहे. त्यामुळे आंदोलन तुर्तास स्थगित करत आहे. पण ११ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री यांच्या बैठकीत कोणता निर्णय होतो, कोणत्या कोणत्या मागण्या मार्गी लागतात, हे पाहूनच पुढील निर्णय घेऊ. तोपर्यंत सर्व कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी शांत रहावे. जर ठोस निर्णय झाले नाही, तर १२ सप्टेंबर पासून पुन्हा आक्रमकपणे रस्त्यावर उतरू.
- रविकांत तुपकर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT