Bribery Arrest Agrowon
ॲग्रो विशेष

Jigaon Project Extortion : भूसंपादन मोबदल्याच्या नावाखाली खंडणीची मागणी? प्रशांत डिक्करांविरुद्ध गुन्हा दाखल

Land Acquisition Compensation : शुक्रवारी (ता. २१) शेगाव येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकींमध्ये शेतकऱ्यांनी डिक्कर यांना पैसे परत मागितले.

 गोपाल हागे

Buldana News : जिल्ह्यातील महत्त्वाकांक्षी असलेल्या जिगाव प्रकल्पात भूसंपादन झालेल्या शेतीचा अधिकचा मोबदला मिळवून देण्याच्या कारणासाठी खंडणीची मागणी केल्याच्या आरोपाखाली शेतकरी नेते म्हणून काम करणारे प्रशांत डिक्कर यांच्यावर येथील शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी डिक्कर यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला असून चौकशी सुरू केली आहे.

यासंदर्भात पोलिसात संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावाच्या पुष्पा संदीप मोरखडे यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी त्यात म्हटले, की आठ दिवसाआधी मोरखडे यांना संपादित शेतीचे प्रति एकर अंदाजे ४० लाख रुपये लाभ मिळवून देतो, असे सांगून डिक्कर याने मोरखडे व शेतकऱ्यांकडून ५ लाख रुपये घेतले.

तसेच डिक्कर यांनी शेतकऱ्यांना पैशांची मागणी केली होती. पैसे दिले नाही तर शासनाचा कुठलाही लाभ मिळू देणार नाही, अशी धमकी दिली. अशा प्रकारच्या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी डिक्कर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जिगाव प्रकल्प कार्यालयात लोटपोट

शुक्रवारी (ता. २१) शेगाव येथील जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकींमध्ये शेतकऱ्यांनी डिक्कर यांना पैसे परत मागितले. या वेळी शाब्दीक चकमक होऊन लोटपाटीचा प्रकार घडल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.

विधानसभा लढवली

गेली अनेक वर्षे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष म्हणून काम केलेले प्रशांत डिक्कर हे गेल्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनस्वराज्य पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. जळगाव जामोद विधानसभा मतदार संघात त्यांचा मोठ्या मतांनी पराभवही झाला.

संघटनेला बदनाम करू नका

निवडणुकीपुर्वी डिक्कर यांनी संघटना सोडून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षात प्रवेश घेतला होता. त्यांच्या चिन्हावर ते निवडणुकही लढले. आता त्यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी कुठलाही संबंध राहिलेला नाही. त्यामुळे कुणीही समाज माध्यमात डिक्कर यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध असल्याचे भासवून राजू शेट्टी व संघटनेला बदनाम करू नये, असे आवाहन स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lumpy Skin Disease: राज्यात ‘लम्पी स्कीन’ पुन्हा डोके वर काढतोय

Jan Suraksha Bill: ‘जनसुरक्षा’ दोन्ही सभागृहांत मंजूर

Animal Husbandry Status: पशुपालनाला आता कृषी समकक्ष दर्जा

Cotton Mission 2030: देश कापूस क्षेत्रात २०३० पर्यंत स्वयंपूर्ण करणार

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

SCROLL FOR NEXT