Mahad News : जुलैतील अतिवृष्टीमुळे तर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अवेळी पावसामुळे महाड तालुक्यातील भात शेतीचे मोठे नुकसान झाले होते. सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई जाहीर केली आहे, मात्र ती अद्याप न मिळाल्याने महाडमध्ये बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.
तालुक्यात ग्रामीण भागामध्ये १३ हजार हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. महाडमध्ये जुलैत पुराचे पाणी शिरल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. हे नुकसान सोसत शेतकऱ्यांनी लागवड करून पीक घेतले, मात्र ऐन कापणीच्या वेळी ऑक्टोबरमध्ये अवेळी पावसाने पुन्हा तडाका दिल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेले पीक हिरावून नेले.
शेतकऱ्यांचे नुकसान लक्षात घेऊन सरकारने पंचनामे करण्याचे आदेश देत भरपाईची घोषणा केली. जुलैतील नुकसानीसाठी प्रति हेक्टर आठ हजार ५०० रुपये तर ऑक्टोबरमधील नुकसानीसाठी १३ हजार ६०० रुपये प्रति हेक्टर अशी भरपाई सरकारने जाहीर केली, परंतु सहा-सात महिन्यांचा कालावधी लोटला तरी सरकारकडून भरपाईची रक्कम मिळालेली नाही.
अतिवृष्टीमुळे नुकसान
जुलै २०२३
बाधित गावे ४४
बाधित क्षेत्र ५२.१७ हेक्टर
बाधित शेतकरी ७९९
अवकाळीमुळे नुकसान
ऑक्टोबर २०२३
बाधित गावे १५१
बाधित क्षेत्र ५२३.८७ हेक्टर
बाधित शेतकरी २०४२
कोकणातील शेतकरी अल्पभूधारक असल्याने त्यांना मिळणारी नुकसानीची रक्कमही कमी असते. ती वेळेवर मिळाली तरच शेतकऱ्याला पुढील शेतीची कामे करण्यास मदत मिळू शकेल. मात्र गेल्या काही वर्षांत नुकसान भरपाई घोषित होते, मात्र ती मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.परशुराम मोरे, शेतकरी
नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करण्यात आले आहे. सरकारकडून भरपाई मिळतात शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल. याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.महेश शितोळे, तहसीलदार, महाड
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.