Crop Damage Compensation : यवतमाळ जिल्ह्यातील तीस हजार शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षा

Unseasonal Rain : गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये महागाव तालुक्‍यात अतिवृष्टीने दाणादाण उडाली होती. या नुकसानीसाठी ३० हजार शेतकऱ्यांकरिता तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला.
Crop Damage Compensation
Crop Damage CompensationAgrowon

Yavatmal News : गेल्या वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये महागाव तालुक्‍यात अतिवृष्टीने दाणादाण उडाली होती. या नुकसानीसाठी ३० हजार शेतकऱ्यांकरिता तीस कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मात्र तो अद्यापही खात्यात जमा झाला नसल्याने शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम असून, प्रशासनिक कारभारावर नाराजी व्यक्‍त केली जात आहे.

गेल्या खरीप हंगामात जुलै- ऑगस्ट महिन्यांत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्‍यांमध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. त्याचा फटका महागाव तालुक्‍यालाही बसला. अतिवृष्टीच्या परिणामी नद्या-नाले तुडुंब झाल्याने हे पाणी शेतात शिरत अनेकांचे शिवार खरडून गेले. जमीन नापेर झाल्याने शेतकऱ्यांसमोरील संकट आणखीच गडद झाले.

Crop Damage Compensation
Banana Crop Damage : वादळात केळीचे कोट्यवधींचे नुकसान

अशा स्थितीत शासनाकडून तत्काळ आर्थिक मदतीच्या माध्यमातून दिलासा मिळणे अपेक्षित होते. परंतु शासनाने महागाव तालुक्‍यातील ३० हजार शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली तीस कोटींची मदत अद्यापही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे.

विशेष म्हणजे खाते बदल, नावातील बदल यामुळे पैशाची अफरातफर होण्याची शक्‍यता पाहता शासनस्तरावरून आधार प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्याकरिता थंब घेण्याची प्रक्रिया राबविली गेली. परंतु अनेकांचे थंब लागत नसल्याने सेतू केंद्रावर रात्री १२ वाजेपर्यंत रांगा लागत होत्या.

Crop Damage Compensation
Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना ‘अवकाळी’च्या अनुदानाची प्रतीक्षा

महागाव तालुक्‍यातील तीस हजारांवर शेतकऱ्यांपैकी २० हजार ९७२ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया झाली आहे. १२ हजार ३७० शेतकऱ्यांचे खाते अजूनही केवायसी अपडेट झालेले नाही. सर्व्हेरची गती अतिशय मंद असल्याची ओरड केवायसी अपडेट करणाऱ्या केंद्र संचालकांद्वारे होत आहे.

यंत्रणाच सदोष

थंब प्रमाणीकरण केल्यानंतरच आधार कार्ड लिंक असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्‍कम ७२ तासांत जमा होणार होती. परंतु ती अद्यापही झाली नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com