Farmer Struggle  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Struggle : मोडला बैलबारदाना, पण मोडला नाही कणा

Farmer Manually Ploughing : बैल बारदाना मोडला तरी त्यांनी पाठीचा कणा व त्यातील ताकद वयाच्या पंच्याहत्तरीतही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

Team Agrowon

Latur News : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पाऊस हुलकावणी देत असल्याने उगवलेल्या पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांचा प्राणांतिक संघर्ष सुरु आहे. यातील कोळपणीसाठी ट्रॅक्टरभाडे खर्च परवडत नसल्याने व हे ट्रॅक्टर गरजेच्या वेळी उपलब्ध होत नसल्याने हडोळती (ता. लातूर) येथील शेतकरी अंबादास पवार यांनी पत्नी मुक्ताबाईंच्या मदतीने स्वतःच्या कोळपणी सुरु केली आहे.

दहा वर्षापासून त्यांचा हा संघर्ष रविवारी (ता. २९) कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर सोशल मिडियावर त्यांच्या परिस्थितीसमोर हताश न होता सुरु असलेल्या कष्टाचे कौतुक झाले. बैल बारदाना मोडला तरी त्यांनी पाठीचा कणा व त्यातील ताकद वयाच्या पंच्याहत्तरीतही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

शेती व्यवसायातील वाढलेले खत, बी बियाण्यांचे भाव, शेतांतील कामांसाठी मजुरांचा तुटवडा, मशागतीच्या कामांसाठी यांत्रिककरणाचे वाढलेले भाव, बाजारात शेतीमालाला मिळणारा कमी भाव, पावसाचा लहरीपणा अशा एक ना अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. यात कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मोठ्या आहेत. हंगामात मजुरीचे भाव गगनाला भिडले आहेत. रोजंदारीऐवजी गुत्ते मजुरीची प्रथा पुढे आले आहे.

यामुळे बैलबारदाना असलेले मजुरही कोळपणीसाठी एकरी अडीच हजार मजुरीची मागणी करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पैसे देऊनही गरजेच्या वेळी कोणीच उपलब्ध होत नाही. यामुळे पिकांचे नुकसान होते. यावर शेतकरी अंबादास पवार यांनी अफलातून मार्ग शोधला आहे. मागील दहा वर्षापासून ते पत्नीच्या मदतीने कोळपणीचे काम करतात.

कोळपणी सुलभ व्हावी म्हणून त्यांनी खराब ट्युबने खांद्याला बांधून ओढतात. पवार यांना हडोळती शिवारा पवार यांची २ एकर ९ गुंठे जमीन आहे. जमीनीवरच त्यांची उपजीविका आहे. निसर्गाची साथ नाही. शेतीमालाला योग्य भाव नाही. शेती पडीक पडली तर जगावं कसं ? या उतार वयात मजूरीने कोणी लावत नाही. वाडवडीलांनी ठेवलेली ही भाकर खूप कष्टाची झाली आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT