Soil Testing: मृद्‌ चाचणी प्रयोगशाळेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

RKVY Scheme: राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ग्रामस्तरीय मृद्‌ चाचणी प्रयोगशाळा उभारणीसाठी ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात १५ प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून, यासाठी शासनाकडून अर्थसहाय्य मिळणार आहे.
Soil Testing
Soil TestingAgrowon
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ग्रामस्तरीय मृद्‌्‌ चाचणी प्रयोगशाळा उभारणीकरिता ७ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण १५ मृद्‌्‌ नमुने तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार असून शिरूर आणि जुन्नर तालुक्यांत प्रत्येकी २ व उर्वरित ११ तालुक्यांमध्ये प्रति तालुका एक प्रयोगशाळांच्या उभारणीस शासनाद्वारे अर्थसाह्य देण्यात येणार आहे.

प्रत्येक ग्रामस्तरीय मृद्‌्‌ चाचणी प्रयोगशाळा उभारणीस १ लाख ५० हजार रुपये अर्थसाह्य देण्यात येणार आहे. प्रयोगशाळेची मृद्‌्‌ नमुने तपासणी क्षमता वार्षिक ३ हजार असणार असून प्रथम ३०० मृद्‌्‌ नमुने तपासणीस प्रति मृद्‌्‌ नमुना ३०० रुपये, मृद्‌्‌ व आरोग्य सुपीकता कार्यक्रमाअंतर्गत देण्यात येणार आहे.

Soil Testing
Soil pH: जमिनीचा सामू महत्त्वाचा...

त्याव्यतिरिक्त पुढील ५०० मृद्‌ नमुन्यांसाठी प्रति २० रुपये प्रोत्साहन तसेच उर्वरित मृद्‌ नमुने त्या प्रयोगशाळेने स्वबळावर शेतकऱ्यांकडून शासकीय दरानुसार शुल्क आकारणी करून तपासणी करून द्यावे लागणार आहे.

वैयक्तिकरित्या मृद्‌ चाचणी प्रयोगशाळा उभारणी करणाऱ्या युवक, युवतीचे वय १८ ते २७ वर्षे असावे. लाभार्थी उद्योजक विज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असलेला १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्जदार, उद्योजक गटाकडे स्वतःची किंवा किमान चार वर्षांसाठी भाडेपट्टा करारासह भाड्याने घेतलेली इमारत असावी.

Soil Testing
Soil Testing : नाशिक जिल्ह्यात १५ ग्रामस्तरीय मृद परीक्षण केंद्रांची होणार उभारणी

शेतकरी उत्पादक संस्था कृषी चिकित्सालय आणि कृषी व्यवसाय केंद्रे, कृषी आवश्यक, माजी सैनिक, बचत गट, शेतकरी उत्पादक संस्था गट, शेतकरी सहकारी संस्था, किरकोळ निविष्ठा विक्रेते आणि शाळा, महाविद्यालयीन युवक, युवतींना अर्ज करता येणार आहे.

अर्जाची छाननी जिल्हा यंत्रणेमार्फत करण्यात येणार असून जिल्हास्तरीय समितीद्वारे पात्र लाभार्थ्यांची निवड करण्यात येईल. अर्जदाराने अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, पॅन कार्ड, आधार कार्ड आदी कागदपत्रे सादर करावी जोडावी.

अधिक माहितीकरिता www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अधिकाधिक इच्छुकांनी उपसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावे, असे आवाहन श्री. काचाळे यांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com