Agriculture Company Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Company : शेतकरी कंपन्यांना वायदे बाजाराद्वारे नफा मिळवणे शक्य

Team Agrowon

Washim News : कृषी उत्पादनसोबत एनसीडीईएक्सच्या माध्यमातून बाजार पेठेचा अभ्यास करून पीक नियोजन केल्यास अधिक आर्थिक नफा मिळविणे शक्य आहे. पिकांची उत्पादकता वाढवण्यासोबतच शेतीवरील खर्च कमी करावा व एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी केले.

कृषी विज्ञान केंद्र आणि एनसीडीईएक्स यांच्या तर्फे शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना, प्राथमिक कृषी पतसंस्थांना वायदेबाजाराची ओळख या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार होते. प्रमुख उपस्थितांमध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. रवींद्र काळे, इति बेदी, स्वप्नील पैठणे, ललिता चौरे, स्मार्ट प्रकल्पाच्या अंजली कोले आणि कृषी जागरणचे शुभ्र मोहंती, कृषी अर्थशास्त्रज्ञ डॉ. डी. एन. इंगोले, उद्यानविद्या तज्ञ निवृत्ती पाटील, शुभांगी वाटाणे, श्रीकृष्ण बावस्कर उपस्थिती होते.

अध्यक्षीय मार्गदर्शनात श्री. कोकडवार यांनी शेती व्यवसायात अधिक उत्पादनाकरिता तांत्रिक माहिती गरजेचे असून त्यासोबत सध्याच्या काळात भविष्यातील बाजारभावाची तांत्रिक माहितीसुद्धा अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांनी शासकीय योजनांचा उपयोग करून एकत्रित खरेदी विक्री व्यवस्था आणि गोदाम साखळी निर्माण करून सभासदांना लाभ मिळवून द्यावा असे आवाहन केले. तांत्रिक सत्रात ललिता चौरे यांनी बाजारपेठेसोबतच ऑनलाइन किंवा इतर बाजारपेठेचा विचार करावा असे सांगितले. इति बेदी यांनी वायदा बाजारा विषयी सादरीकरण केले.

स्वप्नील पैठणे यांनी एनसीडीईएक्सची विक्री पद्धती, मालाची प्रत, गोदाम व्यवस्थापनावक माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment : बांबूच्या वस्तू निर्मितीतून आदिवासी महिला झाल्या कुशल

Sharad Pawar : साखरपट्ट्यातील आणखी एक दिग्गज नेता शरद पवारांच्या साथीला; अजित पवार यांना धक्का

Book Review : जगण्याचा आदीम तळ धुंडाळणारी रिंगाण

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

SCROLL FOR NEXT