सकाळ वृत्तसेवा
indapur News : कळस ः शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून शेततळे शेतकऱ्यांसाठी वॉटर बँक ठरत आहे. गेल्या काही वर्षांत कृषी विभागाच्या विविध योजनांतून इंदापूर तालुक्यात सुमारे दोन हजारांहून अधिक शेततळी उभारण्यात आली आहेत. यातून सुमारे एक हजार कोटी लिटरहून अधिक पाणी साठविण्यात येत आहे.
नीरा नदीकाठचा पट्टा व उजनीच्या बॅकवॉटरलगतच्या परिसरात उसाचे क्षेत्र अधिक आहे. मात्र तालुक्याच्या अवर्षण प्रवण क्षेत्रात फळबाग लागवडीचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये द्राक्ष, डाळिंब, पेरू, मोसंबी, संत्री, कागदी लिंबू, सीताफळ यांसारख्या फळबागांचा समावेश आहे.
तसेच अन्य तरकारीच्या पिकांची उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागविण्यासाठी शाश्वत पाण्याचा स्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची परवड होत होती. मात्र शेतकऱ्यांनी शेततळ्यांच्या उभारणीस प्राधान्य दिले. पावसाळ्यातील जास्तीचे पाणी व कालव्याच्या आवर्तनातून ही शेततळी भरली जातात. उन्हाळ्यातील पिकांच्या पाण्याची गरज भागविण्यासाठी या शेततळ्यांतील पाण्याचा मोठा उपयोग होतो.
राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक गणेश सांगळे म्हणाले, ‘‘शेततळ्यांमुळे फळबागांना उन्हाळ्यातील पाण्याची गरज भागविणे शक्य होत आहे. परिणामी तालुक्यातील फळबागांचे क्षेत्र वाढले आहे. मार्चपासून मे अखेरपर्यंत या शेततळ्यांतील पाणी पिकांना वापरता येते. द्राक्षाच्या खरड छाटणीवेळी पाण्याची अत्यावश्यक गरज या शेततळ्यांतून भरून निघते.’’
‘‘खडकवासला’चे आवर्तन सुरू करा’
‘‘यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने खडकवासला कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची शेततळी आताच निम्मी रिकामी झाली आहेत. यामुळे खडकवासला कालव्याला आवर्तन सुरू करणे गरजेचे आहे,’’ अशी मागणी सांगळे यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.