Hapoos Mango Prices agrowon
ॲग्रो विशेष

Hapoos Mango Prices : हापूस आंब्याच्या दरात घसरण, वादळी पावसाचा परिणाम

Mango Rate : आंबा झाडावर किंवा आडीत पिकविण्यासाठी राहिला तर तो खराब होण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदारांनी आंबा बाजारपेठेकडे पाठवला.

sandeep Shirguppe

Mango Rate Kolhapur : गुढी पाडवा झाल्यानंतर कोकणातल्या आंब्याची मोठ्या प्रमाणात कोल्हापूर जिल्ह्यात आवक झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. दरम्यान मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा डझनमागे हापूस आंब्याचे दर ३०० रुपयांनी उतरले आहेत. मागच्या आठ

दिवसांत झालेले ढगाळ वातावरण, तसेच आंब्याची वाढती आवक त्यामुळे हापूस आंब्याचे दर उतरले आहेत. साडेतीनशे रुपयांचा बॉक्स भाव सध्या २०० ते २५० रुपयांपर्यंत खाली आला. १८०० रुपयांच्या ५ डझनाच्या पेटीचा भाव १२०० रुपये पेटीपर्यंत खाली आला. त्यामुळे हापूस आंबा खाणाऱ्यांना चांगलीच संधी आली आहे.

यामध्ये आंबा उत्पादक शेतकऱ्याला आपल्या मालाची चांगली आवक होत असल्याने चार पैसे हातात मिळत असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. दोन महिन्यांपूर्वी कोल्हापुरात हापूस आंब्याचे आगमन झाले. त्यानंतर आवक तुरळक होती. गेल्या चार दिवसांत कोकणातून परदेशात जाणाऱ्या आंब्याची मागणी कमी झाली. यात ढगाळ वातावरणमुळे आंबा पीक खराब होण्याची भिती होती.

आंबा झाडावर किंवा आडीत पिकविण्यासाठी राहिला तर तो खराब होण्याची शक्यता असल्याने आंबा बागायतदारांनी आंबा बाजारपेठेकडे पाठवला. त्यामुळे कोल्हापुरात आवक वाढली. सध्या रोज ६०० ते ८०० पेट्या, तर १३ ते १४ हजार बॉक्सची आवक होत आहे. त्यामुळे आंबा आवक वाढली.

यात शहरात विविध स्टॉल्सवर आंबा विक्रेत्यांनी बाजार समितीत आंबा न घेता थेट कोकणातील एजंटाकडून आंबा खरेदी करून विक्री सुरू केली. त्यांच्याकडे आंबा स्वस्त मिळत आहे. बाजार समितीत घाऊक बाजारपेठेत बॉक्सचा सरासरी भाव कमीत कमी १०० ते २०० रुपये आहे. असा बॉक्स किरकोळ बाजारात २०० ते २५० रुपयाला मिळत आहे.

अन्य आवक कमी

सर्वच प्रकारच्या आंब्यामध्ये एका बॉक्समध्ये १२ ते १६ आंबे असतात. लहान-मोठे आंबे बघून त्याची बॉक्समधील संख्या ठरते. दक्षिण भारतीय आंबा, मद्रास हापूस आंबा २०० ते २५० रुपये बॉक्स व लालबाग आंबा ८० ते १५० रुपये बॉक्स, असे भाव आहेत. त्याची आवक जेमतेम असल्याचे दिसून येते.

आंब्याची आवक वाढू लागली आहे. पाऊस पडल्यास आंबा खराब होतो. त्यामुळे आंब्याचे भाव कमी होत आहेत. यापेक्षा आणखी भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. सध्याच्या आवकेतील आंबा चांगल्या दर्जाचा आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.

- सादीक बागवान, विक्रेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT