sandeep Shirguppe
फळांचा राजा आंब्याचा सिझन सुरू झाला की सगळे लोक मिळेल तितका आंबा खातात.
परंतु आंबा उष्ण पदार्थ असल्याने तो खाल्ल्यास अनेकांना आरोग्याच्या तक्रारी व्हायला लागतात.
पण, कच्ची कैरी खाण्याचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे आहेत. कच्ची कैरी खाणे अनेकांना आवडते.
कच्च्या आंब्यामध्ये पेक्टिन असते ज्यामुळे आतडे निरोगी होतात. यामुळे आतड्यांची हालचाल व्यवस्थित राहण्यासही मदत होते.
कैरीत व्हिटॅमिन सी लोहाचे शोषण वाढवते. जर तुम्हाला ॲनिमियाचा त्रास होत असेल तर कच्चा आंबा आहारात ठेवा.
कैरी लोहाच्या कमतरतेला सामोरे जाण्यास मदत करते तसेच उष्माघाताचा धोकाही कमी करतो.
कच्च्या कैरीत असलेले मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाण्याची कमतरता दूर करतात.
प्रेग्नेंसीमध्ये कच्चा आंबा खाल्ल्याने व्हिटॅमिन सी आणि फोलेट सारख्या व्हिटॅमिन-खनिजांचा हा एक चांगला स्रोत आहे.