Fake Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizer : वाशीम जिल्ह्यात बनावट खतसाठा जप्त

Kharif Season 2025 : चौकशीत दिनेश चव्हाण यांनी हे खत जयपूर येथून आणल्याचे सांगितले. त्यांनी सादर केलेल्या बिलानुसार राधिका अॅग्रो इंडस्ट्रीज अजमेर व श्री अॅग्रो इंडस्ट्रीज जयपूर यांच्यासोबत आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगितले.

Team Agrowon

Washim News : जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात असलेल्या कारपा येथे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करीत मोठ्या प्रमाणावर असलेला बनावट खताचा साठा उघडकीस आणला. याप्रकरणी दिनेश गजानन चव्हाण (वय ३६), राधिका अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (खसरा जि. अजमेर राजस्थान) व श्री अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज (जयपूर) यांच्यासह अज्ञात आरोपींवर मानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कृषी अधिकारी संदीप साळवे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई मंगळवारी (ता. तीन) रात्री उशिरापर्यंत चालली. त्यानंतर मानोरा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. कारपा येथील दिनेश चव्हाण यांच्या घरी ६०० बॅग बनावट खत साठवून ठेवलेले आढळून आले. या बॅगपैकी काही बॅग पांढऱ्या व अनब्रँडेड होत्या.

तर काहींवर कृभको (KRIBHCO) कंपनीचा छपाई केलेला मजकूर होता. घटनास्थळी बॅग क्लोजर मशिन, सिलाई धागा, रिकाम्या छपाई केलेल्या बॅग आणि अन्य साहित्य आढळून आले. यावरून हे खत बनावट पद्धतीने रिपॅकिंग करून विक्रीसाठी तयार करण्यात येत होते, हे स्पष्ट झाले.

चौकशीत दिनेश चव्हाण यांनी हे खत जयपूर येथून आणल्याचे सांगितले. त्यांनी सादर केलेल्या बिलानुसार राधिका अॅग्रो इंडस्ट्रीज अजमेर व श्री अॅग्रो इंडस्ट्रीज जयपूर यांच्यासोबत आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे सांगितले. मात्र, बिलांवर कोणतीही स्वाक्षरी अथवा अधिकृत माहिती आढळून आलेली नाही. तसेच या खताच्या किमतीत मोठा तफावत आढळली.\

या सर्व प्रकरणात दिनेश चव्हाण यांनी भारतीय न्यायसंहितेच्या कलम ३१८(४), ३३६(४), ३४०(२) तसेच खत नियंत्रण आदेश १९८५ च्या विविध कलमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय शासनाच्या अनुदानाचा गैरवापर करीत योजनेचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणी एकूण ९ लाख ५ हजारांचा बनावट माल, मोबाइल फोन जप्त करण्यात आले असून, मोबाइलच्या माध्यमातून इतर आरोपींचा तपास सुरू आहे. १५० रुपये किमतीच्या बॅगवर त्याने १४७० रुपये एवढी किंमत लिहून विक्रीचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले. कारवाईमध्ये मानोरा पंचायत समिती कृषी अधिकारी संदीप साळवे, तालुका कृषी अधिकारी रोशन भागवत, मंडळ कृषी अधिकारी उमेश राठोड, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी अभिजीत देवगिरीकर, मोहीम अधिकारी गणेश गिरी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण इंगळे यांनी सहभाग घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT