Illegal Grain Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Grain Procurement : किमान आधारभूत दराने धान्य खरेदीस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

MSP Procurement Scheme : शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये, याकरिता ही योजना राबविण्यात येते.

Team Agrowon

Pune News : केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान, रागी ही भरडधान्य खरेदी करण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ नाशिकच्या जुन्नर प्रादेशिक कार्यालयाने दिली आहे.

शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने (डिस्ट्रेस सेल) धान्य विकावे लागू नये, याकरिता ही योजना राबविण्यात येते. राज्य शासनाने आदिवासी उपाययोजना क्षेत्रात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची मुख्य अभिकर्ता म्हणून नियुक्ती केलेली आहे.

या योजनेअंतर्गत राज्यात ‘वाजवी सरासरी गुणवत्ता’, अर्थात ‘एफएक्यू’ दर्जाचे धान व भरडधान्याची खरेदी करण्यात येते. राज्यातील शेतकऱ्यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा हा शासनाचा हेतू आहे.

हंगाम २०२३-२०२४ मध्ये धान ‘अ’चे प्रतिक्विंटल खरेदीदर २ हजार २०३ रुपये, धान साधारण- २ हजार १८३ रुपये, तर रागीचे खरेदीदर ३ हजार ८४६ रुपये लागू करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील पारगावतर्फे मढ व खेड तालुक्यांतील डेहणे येथे महामंडळाची खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. येथे धान, भरडधान्य खरेदीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना नोंदणीसाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

खरेदी केंद्रावर शासनाच्या ‘एनईएमएल’ पोर्टलवर शेतकरी नोंदणी सुरू आहे. नोंदणीसाठी ७/१२ व ८ अ चा उतारा, चालू हंगामातील पीकपेराची नोंदणी, बँक पासबुक व आधार कार्डच्या छायांकित प्रतीची आवश्यकता आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी खरेदी केंद्रावर वा कार्यालयात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळाच्या जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक व्यवस्थापक रा. भ. पाटील यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Power Supply Disconnection: ३४ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

Labour Migration: मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी सोयगावात १२० कामे मंजूर

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांना पीएम किसानचा पुढचा हप्ता कधी मिळेल?; जाणून घ्या संपूर्ण माहिती

E Crop Survey: आता ऑफलाइन करता येणार ‘ई-पीकपाहणी’: उज्ज्वला पांगरकर

E Crop Survey: ई-पीक पाहणी न झालेल्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT