Banana Farming  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Crop Management : केळीच्या गुणवत्ता, उत्पादकतावाढीवर द्या लक्ष

Banana Farming : सोलापूर जिल्ह्यातील वातावरण केळीसाठी अत्यंत पोषक आहे. वर्षभर कोणत्याही महिन्यात केळीची लागवड आपल्याकडे होऊ शकते, स्थानिक बाजारासह परदेशातही आपल्या केळीला उठाव मिळू शकतो.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील वातावरण केळीसाठी अत्यंत पोषक आहे. वर्षभर कोणत्याही महिन्यात केळीची लागवड आपल्याकडे होऊ शकते, स्थानिक बाजारासह परदेशातही आपल्या केळीला उठाव मिळू शकतो. पण त्यासाठी केळीच्या गुणवत्ता आणि उत्पादकतावाढीवर लक्ष द्यायला हवे, असे मत केळी उत्पादक, तज्ज्ञांनी शनिवारी (ता.२६) अकलूज येथे आयोजित अॅग्रोसंवाद कार्यक्रमात व्यक्त केले.

‘अॅग्रोवन’च्या २० व्या वर्धापनदिनानिमित्त अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने `अॅग्रोवन` आणि हायजेनिक अॅग्रोच्यावतीने केळी पीक व्यवस्थापन या विषयावर अॅग्रोसंवाद कार्यक्रम पार पडला.

अकलूज बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, केळी निर्यातदार किरण डोके, प्रगतशील केळी उत्पादक सोमनाथ हुलगे, हायजेनिक अॅग्रोचे कार्यकारी संचालक स्वप्नील सूर्यवंशी, बाजार समितीचे संचालक बाबूराव कदम, नितीन सावंत, पोपट भोसले, आनंद फडे, उद्धव डोंगरे, माजी उपसभापती प्रतापराव पाटील, शिवामृतचे उपाध्यक्ष दत्तात्रय भिलारे, आशिष खराडे, मंडलकृषी अधिकारी सतीश कचरे, बाजार समितीचे सचिव राजेंद्र काकडे, हायजेनिक अॅग्रोचे एरिया मॅनेजर सागर देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.

केळी निर्यातदार श्री. डोके म्हणाले, की सोलापूर जिल्ह्यातील वातावरण जळगावच्याही तुलनेत केळीला अत्यंत पूरक आहे, त्यामुळे केळीला चांगली गुणवत्ता आहे, पण योग्य नियोजन, व्यवस्थापन केल्यास उत्पादनवाढही मिळू शकते. अन्नद्रव्यव्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन यावर काम करताना, फ्रूटकेअरसारख्या व्यवस्थापनावरही बारकाईने काम व्हायला हवे.

आज केवळ सोलापूर जिल्ह्यात केळीची लागवड ३० हजार हेक्टरवर पोचली आहे. तर या पिकातून सुमारे ६००० कोटी रुपयांचे चलन एकटा सोलापूर जिल्हा देतो आहे, यावरुन केळीला किती वाव आहे, हे लक्षात येईल. आपल्याकडे कोल्डस्टोरेज, पॅकहाऊस यासारख्या पायाभूत सुविधाही चांगल्या उपलब्ध आहेत, त्याचा उपयोग करून घ्या, असेही ते म्हणाले.

श्री. हुलगे म्हणाले, की केळीची लागवड योग्य अंतराने करा, खत-पाणी व्यवस्थापनावर लक्ष द्या, केळीचे खोडव्यापर्यंतचेही उत्पादन चांगले मिळू शकते, माती-पाणी परीक्षण करा, ताग-धेंचाचा वापर करा, रासायनिक खतांच्या कमी डोससह सेंद्रिय पद्धतीवर भर द्या, योग्य व्यवस्थापन हेच केळीच्या उत्पादकता आणि गुणवत्तावाढीचे गमक आहे.

श्री. मोहिते पाटील म्हणाले, की शेतीचे प्रश्न बदलत आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, त्यावर आपण पर्याय शोधले पाहिजेत. केवळ आपल्या उत्पन्नाचे साधन शेती आहे, हे लक्षात घेऊन ती व्यवसायिकदृष्ट्याच केली पाहिजे. नवी पिढी शेतीत येते आहे, पण त्यांनी वडील ज्या पद्धतीने करत होते, त्या पद्धतीने शेती करून चालणार नाही, नवी पिके, नवे पर्याय शोधले पाहिजेत. आम्हीही बाजार समितीत कोल्डस्टोरेज उभारतो आहोत, त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होईल. अॅग्रोवनचे वरिष्ठ बातमीदार सुदर्शन सुतार यांनी प्रास्ताविक केले. सीनियर एक्झिक्युटिव्ह संदेश कुलकर्णी यांनी स्वागत केले. राजेंद्र काकडे यांनी आभार मानले.

‘अॅग्रोवन खरा मार्गदर्शक’

सभापती मोहिते पाटील म्हणाले, की सरकोली येथील भोसले शेतीत विविध प्रयोग करत होते, पण त्यांना विविध प्रयोग करूनही यश मिळत नव्हते, ज्यावेळी ‘अॅग्रोवन’ सुरू झाला, तेव्हा मात्र त्यांनी अॅग्रोवनमध्ये आलेले विविध प्रयोग, यशकथा, तज्ज्ञांचे लेख वाचून शेतीत विविध प्रयोग सुरू केले. त्या माहितीच्या आधारी पिकांची निवड, बाजारपेठेची त्यांना माहिती मिळाली. आज ते यशस्वी शेतकरी आहेत, हे मी स्वतः पाहिले आहे. ‘अॅग्रोवन’ खऱ्या अर्थाने मार्गदर्शक आहे, अशी आठवणही त्यांनी सांगितली.

प्रयोगशील शेतकऱ्यांचा सन्मान

‘अॅग्रोवन’च्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून शहाजी कदम (तांबवे), अरुण पवार (श्रीपूर), सुनील पिसे (यशवंतनगर), केशवराज माने (टाकळी) नितीराज जाधव (कराड) या शेतकऱ्यांचा बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

India Onion Export: बांगलादेशात पाच महिन्यांनंतर भारतीय कांद्याची निर्यात

Agricultural Export: कृषी निर्यात चार लाख कोटींवर

Papaya Supply: खानदेशात पपईची आवक नीचांकी स्थितीत

Vidarbha Heavy Rain: विदर्भात पावसामुळे हाहाकार

Rabi Crops Trials: राज्यात दहा हजार हेक्टरवर पीक पद्धतीवर रब्बी प्रात्यक्षिके

SCROLL FOR NEXT