Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Advisory : कृषी सल्ला : कोकण विभाग

Agricultural Tips : सुपारी बागेस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देण्यात यावा. तीन वर्षांवरील सुपारीला १६० ग्रॅम युरिया आणि १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड प्रमाणे बांगडी पद्धतीने द्यावीत.

Team Agrowon

Farming Advice :

सुपारी

वाढीची अवस्था

सुपारी बागेस डिसेंबर ते जानेवारी महिन्यात रासायनिक खतांचा दुसरा हप्ता देण्यात यावा. तीन वर्षांवरील सुपारीला १६० ग्रॅम युरिया आणि १२५ ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश प्रति झाड प्रमाणे बांगडी पद्धतीने द्यावीत. सदर खताची मात्रा तीन वर्षांपेक्षा कमी वयाच्या लागवडीस देताना पहिल्या वर्षी १/३ पट आणि दुसऱ्या वर्षी २/३ पट या प्रमाणे देण्यात यावी.

कोरड्या हवामानाची शक्यता लक्षात घेता सुपारीची काढणी करून सुपाऱ्या उन्हामध्ये चांगल्या वाळवून घ्याव्यात. सुपारीची काढणी घडाची संपूर्ण फळे नारंगी रंगाची झाल्यानंतर करावी. काढणी केलेल्या सुपारीवरील सालीचे पट्टे काढून फळे उन्हात ४० ते ४५ दिवस वाळवावीत.

सुपारी बागेस ६ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी.

वांगी व टोमॅटो

रोप अवस्था

तुडतुडे, पांढरी माशी व मावा इत्यादी किडींच्या नियंत्रणासाठी पिकामध्ये पिवळे चिकट कागदाचे सापळे लावावेत.

टोमॅटो व वांगी पिकांवरील फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी विद्यापीठाने विकसित केलेले अनुक्रमे हेलिल्युर व ल्युसिनल्युर युक्त रक्षक सापळे हेक्टरी चार या प्रमाणात लावावेत.

कलिंगड

वाढीची अवस्था

कलिंगड पिकावरील रस शोषक किडींच्या व्यवस्थापनासाठी पिवळे चिकट कागदाचे सापळे प्रति गुंठा १ सापळा या प्रमाणे लावावेत.

पिकास नत्र खताची दुसरी मात्रा ११ ग्रॅम युरिया आणि संकरित कलिंगडाला २० ग्रॅम युरिया प्रति आळे या प्रमाणे लागवडीनंतर एका महिन्याने द्यावी.

कलिंगड पिकास ठिबक सिंचनाद्वारे खत व्यवस्थापन करावयाचे असल्यास, ९० दिवसांच्या पीक कालावधीकरिता एकूण नऊ हप्त्यामध्ये खत व्यवस्थापन करावे. पेरणीनंतर १५ दिवसांनी ठिबक सिंचनाद्वारे खते देण्यास सुरुवात करावी. खाली दिलेल्या तक्त्यानुसार खत व्यवस्थापन एक आठवड्याच्या अंतराने करावे.

पीक अवस्था एकूण हफ्ते प्रति एकर प्रति हप्ता खत मात्रा १९:१९:१९ युरिया ०:०:५० सुरुवातीचा कालावधी ३ १२ किलो १९ किलो ४ किलो वाढीची अवस्था ३ १२ किलो १९ किलो ४ किलो फळधारणा ३ १२ किलो १९ किलो ५ किलो कलिंगड पिकाला ४ ते ५ दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने एक दिवसाआड पाणी द्यावे.

कलिंगड पिकामध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता आहे. फळमाशी नियंत्रणासाठी पिकामध्ये फुले येण्यास सुरुवात झाल्यापासून एकरी दोन ‘क्यु ल्युर’ रक्षक सापळे लावावेत. वेळोवेळी कीडग्रस्त फळे गोळा करून नष्ट करावीत.

८१४९४६७४०१ (कृषी विद्या विभाग आणि ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT