PMC Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Vegetable Exhibition : फळे, फुले, भाजीपाल्याचे शनिवारपासून प्रदर्शन

Latest Marathi News : पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त फळे, फुले व भाजीपाला स्पर्धा, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Pune News : पुणे महापालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त फळे, फुले व भाजीपाला स्पर्धा, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन जंगली महाराज रस्त्यावरील छत्रपती संभाजी महाराज उद्यानात शनिवार (ता. १०) आणि रविवार (ता.११) रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. प्रदर्शनाचे उद्‍घाटन शनिवारी (ता.१०) सकाळी ११ वाजता आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते होणार आहे.

प्रदर्शनामध्ये १२ विभाग असून, २१६ उपविभाग आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या शोभिवंत फुलांच्या कुंड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाबांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, भाजीपाला, सॅलड सजावट, प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शिंपले, वेण्या, गजरे प्रदर्शनात मांडण्यात येणार आहेत.

विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, जरबेरा, गुलाब आदी हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. प्रदर्शनाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक दिले जाणार आहे.

स्पर्धेत यांचा सहभाग

स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मेट्रो, नदी सुधारणा प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, वन विभाग, पुणे सर्प विज्ञान संस्था, राजीव गांधी प्राणी संग्रहालय, पर्यावरण केंद्र, पुष्करणी, उत्तरा पर्यावरण केंद्र, लोणावळा, टिळक आयुर्वेद महाविद्यालय, फ्रेंड्स ऑफ बोन्साय, पिंपरी-चिंचवड महापालिकेचा समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT