Bail Pola 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Bail Pola 2024 : पोळ्याच्या सणाला ग्रामीण भागात उत्साह

Team Agrowon

Nashik News : यंदा जिल्ह्यात अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला. यंदा पेरणीही शंभर टक्के पूर्ण झाली आहे. त्यामुळे पोळ्याच्या सणाला ग्रामीण भागात उत्साह दिसून आला.

शेतकऱ्यांनी बैलांना सजवण्यासाठी साहित्याची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी केल्याचे दिसून आले. ग्रामीण भागाच्या तुलनेत शहरी भागात बैलपोळा बाजारात गर्दी कमी दिसून आली.

वाढत्या यांत्रिकीकरणामुळे बैल जोड्यांची संख्या कमालीची घटली आहे. मात्र असे असताना अनेक हौशी शेतकरी बैलांचे संगोपन करत आहेत. त्यामुळे शेतीकामात वर्षभर राबणाऱ्या या बैलांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा करतात.

बैलपोळ्याच्या आठ दिवस अगोदरपासूनच या सणाची तयारी सुरू होते. मात्र पूर्वीच्या तुलनेत बैलांसाठी लागणाऱ्या साहित्यांच्या दुकानांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पहिल्यासारखा फुलणारा बाजार आता नसल्याची स्थिती आहे. ग्राहकांची संख्याही कमी झाल्याचा परिणाम असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

दरवर्षी पोळ्याला बैलांना सजविण्यासाठी गळ्यातील घुंगरमाळ, कपाळाचे बाशिंग, बेगडे, शिंगाचे गोंडे, बैलांना रंग, रंगीत पट्ट्या, नवीन कासरे, दावे अशा साहित्याने बाजारपेठ भरलेली असते. चालू वर्षी बाजारपेठेतील दुकाने फुलली. ग्रामीण भागात दुकानांत गर्दी दिसून आली. तर शहरात ग्राहकांचा प्रतिसाद अपेक्षित नव्हता. त्यात यंदा बैल सजावट साहित्य १० ते२० टक्क्यांनी महागल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

कसमादे भागात भरतो बैलपोळ्याचा बाजार

ग्रामीण भागात गेल्या पंधरा दिवसांपासून बैल सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याचा बाजार भरत आहे. येथील व्यापारी मनमाड, नांदगाव, चांदवड, देवळा, कळवण, सटाणा, नामपूर, ताहराबाद, जायखेडा, वडेल, सौंदाणे, उमराणे यासह अनेक ठिकाणी विक्रीसाठी जात आहेत. त्यांना चांगला ग्राहक मिळतो. तर नाशिक शहरात पंचवटी परिसरात निमानी, पेठ नाका परिसरात दुकाने थाटली होती. मात्र शेतकऱ्यांची गर्दी कमीच असल्याचे पाहायला मिळाले.

बैल सजावट साहित्य विक्रीचा व्यवसाय वडिलोपार्जित आहे. आम्ही स्वत: सर्व वस्तू तयार करतो. मालेगाव येथील सुत व्यापाऱ्यांकडून माल घेऊन बनवित असतो. स्वत:कडे कला असल्याने विविध प्रकारचे साहित्य बनवतो. या विक्रीतून कुंटुबाचा उदरर्निवाह सुरू आहे.
- शिवाजी शिरसाठ, बैलपोळा साहित्य विक्रेता, मालेगाव
गेल्या काही वर्षांत बैलांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे पहिल्यासारखे ग्राहक खरेदीसाठी येत नाहीत. त्यामुळे बैलपोळ्याच्या बाजारात यंदा गर्दी कमीच होती. हौशी ग्राहक येतात. आपल्या सर्जा राजाला सजवण्यासाठी आवर्जून आमच्याकडे खरेदी करतात.
- गीताबाई साळवे, साहित्य विक्रेत्या, नाशिक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Oilseed Production : 'राष्ट्रीय खाद्यतेल-तेलबिया अभियाना'ला केंद्रिय मंत्रिमंडळाची मंजूरी; तेलबिया उत्पादन वाढवण्याचं उद्दिष्ट निश्चित

Water Conservation : ‘जीआयएस’ प्रणाली कशी चालते?

Inter Cropping : पूर्वहंगामी उसामध्ये योग्य आंतरपिकांची निवड

Madgyal Sheep : माडग्याळ मेंढीपालकांचे गाव

Ova Crop Cultivation : कमी पाण्यात हमखास उत्पादन देणारं 'ओवा पीक'

SCROLL FOR NEXT