Ethanol Production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : इथेनॉल निर्बंधांचा आढावा १५ जानेवारीला घेणार

Sugar Industry : केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिली ग्वाही

Team Agrowon

Ethanol : पुणे ः इथेनॉलकडे साखर वळविण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध कायमस्वरूपी नाहीत. येत्या १५ जानेवारीला पुन्हा आढावा घेतला जाईल, अशी ग्वाही केंद्र सरकारने साखर उद्योगाला दिली आहे.
इंडियन शुगर मिल्स अॅण्ड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (इस्मा) दिल्लीतील वार्षिक सर्वसाधारण सभेला केंद्रीय अन्न मंत्रालयाचे सचिव संजीव चोप्रा यांनी हजेरी लावली होती. त्या वेळी त्यांनी सरकारच्या धोरणात्मक वाटचालीवर प्रकाश टाकला.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, उसाचा रस व पाकापासून इथेनॉल निर्मितीवर केंद्राने लागू केलेले निर्बंध त्वरित हटवावे अशी जोरदार मागणी सचिवांच्या उपस्थितीत ‘इस्मा’ने केली. त्याला प्रतिसाद म्हणून त्याच रात्री निर्बंध अंशतः हटविण्याबाबत सकारात्मक निर्णय केंद्राने घेतला. बंदी कायमस्वरूपी नसून केंद्रीय मंत्रिगट आढावा घेईल.

केंद्राला देशाला लागणारी एकूण साखर व त्यापेक्षा ६० लाख टनांचा राखीव साठा हवा आहे. त्यापेक्षा अधिक असलेल्या साखरेचे रूपांतर किंवा निर्यातीबाबत केंद्र सकारात्मक असल्याचे या वेळी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले आहे.
इथेनॉलच्या खरेदी किमतीत वाढ करण्याबाबत सरकार गांभीर्याने विचार करते आहे.

यामुळे साखर कारखान्यांना आणखी दिलासा मिळू शकतो. मात्र देशातील साखर उद्योगाने आता जादा उतारा व उत्पादन देणाऱ्या तसेच प्रतिकूल हवामानात तग धरून ठेवणाऱ्या ऊस वाणाचा वापर करण्याकडे भर दिला पाहिजे, असा सल्लादेखील केंद्राने दिला आहे.

कोइमतूरच्या ऊस प्रजनन संस्था व लखनऊच्या राष्ट्रीय ऊस संशोधन संस्थेसोबत ऊस विकासाचा कार्यक्रम साखर उद्योगाने हाती घ्यायला हवा, असेही केंद्राचे मत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.


सवलत किमान ५० टक्के हवी
‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी सांगितले, की ऊस रस आणि पाकापासून इथेनॉल निर्मितीवर आधी पूर्ण निर्बंध लावले गेले होते. त्याविरोधात ‘इस्मा’ने जोरदार पाठपुरावा केला. त्यामुळे यापूर्वी कोटा ठरवून दिलेल्या साखर कारखान्यांना आता किमान २५ टक्के निर्मिती करता येईल. तसा सुधारित आदेश केंद्राने जारी केला आहे. अर्थात, आमची मागणी किमान ५० टक्के निर्मितीला मान्यता देण्याची आहे. त्यासाठी पाठपुरावा चालू ठेवला जाईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Global Development Trust : ग्लोबल विकास ट्रस्टच्या कृषिकूलचे उद्घाटन

Agriculture University Promotion : कृषी विद्यापीठातील पदोन्नतीचे आदेश न काढणे कायदेशीर : आनंदकर

Agriculture University Rating : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘ए’ ग्रेड उत्कृष्ट मानांकन

Agriculture Department : ‘महसूल’ पाठोपाठ यंत्रणा असलेला कृषी विभाग विस्कळित

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

SCROLL FOR NEXT