Kharif Crop Loss Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Loss : पावसाअभावी खरीप पिकांना फटका

Rainfall Deficit : मे महिन्यात सुरू राहिलेल्या पावसाने जून महिन्यात सुरूच राहिला. परिणामी मशागत, पेरणी वेळेत झाली नाही.

Team Agrowon

Satara News : सातारा जिल्ह्यात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासून अडचण सुरू झाली आहे. मे महिन्यात सुरू राहिलेल्या पावसाने जून महिन्यात सुरूच राहिला. परिणामी मशागत, पेरणी वेळेत झाली नाही. शेतकऱ्यांनी कच्चा मशागतीवर पेरणी केल्याने पिकांची वाढ खुरटण्याबरोबरच तणाचे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

त्यातच गेल्या एक ते दीड महिन्यापासून पावसाने मारलेली दडी मारल्याने पिकांना पाणी देण्याची वेळ आली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण तर कधी तुरळक पाऊस यामुळे फूलगळती बरोबर किडीचे प्रमाण वाढले असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

मे महिन्यात पाऊस सुरू झाला. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने शेत तयार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणीला सामोरे जावे. काही भागात धुळवाफेवर पेरण्या केल्या जातात. मात्र अगोदर पाऊस सुरू झाल्याने या पेरण्या करता आल्या नाहीत.

पावसाची उघडीप मिळेल त्यावेळी पेरण्याची कामे सुरू ठेवली. मात्र मशागतीशिवाय पेरण्या व सततचा पाऊस त्यानंतर अचानक मारलेली दडी यामुळे पिके सुकण्याबरोबर पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढला आहे. या हंगामात सोयाबीन, भात, बाजरी, ज्वारी, भुईमूग, मका ही पिके घेतली जातात.

जिल्ह्याची जून ते सप्टेंबर मध्ये पावसाची वार्षिक सरासरी ८८६.२ मिलिमीटर आहे. त्यापैकी आतापर्यंत सरासरी ७९७.७ मिलिमीटरपर्यंत झाला आहे. पण तो सरसकट झाला नसून वेगवेगळ्या तालुक्यात कमी जास्त झाला आहे.

जिल्ह्याचे खरिपाचे (ऊस वगळून) क्षेत्र दोन लाख ९७ हजार ९१४ हेक्टर इतके आहे. यापैकी दोन लाख ७२ हजार ५८३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. एक महिन्यापासून मात्र पावसाने दडी मारली आहे. परिणामी पिके ताणावर गेली, शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यास सुरुवात केली आहे.

महाबळेश्वर, जावळी तालुक्यांत भात रोपे तयार करता न आल्याने भात लागणीस उशीर झाला असून काही शेतकऱ्यांना भात लागण करता आलेली नाही. ऊन, पाऊस यामुळे किडीची प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांवर जैविक व अजैविक ताण दिसून येत आहे. पिकांच्या गरजेनुसार व विद्यापीठाच्या सल्ल्यानुसार व्यवस्थापन करणे गरजेचे आहे.
-भूषण यादगीरवार, विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, बोरगाव.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

CCI Cotton Procurment : कापूस उत्पादक शेतकऱ्यांना १० हजार ४०० कोटी रुपये दिल्याची केंद्र सरकारची माहिती; सीसीआयच्या खरेदीपासून शेतकरी मात्र वंचित

Maharashtra Unseasonal Rain: उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; राज्यात कोकण वगळता वादळी पावसाचा इशारा

Village Governance: ग्रामसभा आणि ग्रामस्तरावरची अंमलबजावणी

Dam Water Storage: मंगरूळ, सुकी, अभोडा धरणांत जलसाठा मुबलक

Vidarbha Irrigation Projects: विदर्भातील ५ सिंचन प्रकल्पांची कामे भूसंपादनाअभावी प्रलंबित- गिरीश महाजन

SCROLL FOR NEXT