Supriya Sule Agrowon
ॲग्रो विशेष

Supriya Sule : ईपीएस पेन्शन धारकांच्या कष्टाचा पैसा मिळवून देणार

Team Agrowon

EPS-95 National Organization : माळेगाव, जि. पुणे ः ईपीएस पेन्शन धारकांच्या कष्टाचा पैसा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. तो प्रश्न सोडविण्यासाठी पार्लमेंटमध्ये अनेकदा आवाज उठविला. परंतु या भाजप सरकारने ईपीएस पेन्शन धारकांना अद्याप न्याय दिला नाही. परंतु हा प्रश्न सुटेपर्यंत मी स्वस्त भरणार नाही, अशी ग्वाही खासदार सुप्रिया सुळे यांनी ईपीएस -९५ राष्ट्रीय संघटनेच्या माळेगावच्या लक्षवेधी मेळाव्यात दिली.

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) येथे ईपीएस राष्ट्रीय संघर्ष समितीच्या सेवानिवृत्त पेन्शन धारकांनी ‘लक्षवेधी मेळावा’ आयोजित केला होता. या मेळाव्याच्या उद्‌घाटन प्रसंगी खासदार सुप्रिया सुळे बोलत होत्या. या वेळी ईपीएस समितीचे पश्चिम भारताचे कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव ‌चोपडे, तालुकाध्यक्ष प्रतापराव सातपुते, उपाध्यक्ष बाळासाहेब जगताप, कोषाध्यक्ष भरत कदम, वसंत पैठणकर, राष्ट्रवादी पक्षाचे (शरदचंद्र पवार) तालुकाध्यक्ष ॲड. एस. एन. जगताप, महिला अध्यक्षा वनिता बनकर, कार्याध्यक्ष गौरव जाधव, श्रीकांत पांडुरंग येळे, जयपाल भोसले आदी उपस्थित होते.

ईपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीचे प्रतिनिधी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व चीफ कमांडर अशोक राऊत यांनी पेन्शन धारकांच्या मागणीसाठी अनेक वर्षांपासून मोठा लढा उभारला आहे, असे सांगून सुळे म्हणाल्या, ‘‘बारामतीचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात नेमण्याचे शरदचंद्रजी पवार यांनी केले आहे. ८३ वर्षे बारामतीकरांनी आपण पवारसाहेबांना साथ दिली. परंतु दिल्लीच्या अदृश्य शक्तीने पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व चिन्ह पळविले. परंतु आम्ही त्याची फिकीर बाळगली नाही. गेले पंधरा वर्षे खासदार म्हणून आपली प्रमाणिक सेवा केली. त्यामुळे मला संविधानाने मतदान मागण्याचा अधिकार दिला आहे. बारामतीकरांसह जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर आम्ही आगामी लोकसभेची निवडणूक जिंकणार आहे,’’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रमोद जाधव यांनी केले, तर भरत कदम यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT