Beekeeping
Beekeeping  Agrowon
ॲग्रो विशेष

Beekeeping : पर्यावरण रक्षणकर्ती

Team Agrowon

ज्योती आधाट/तुपे

पर्यावरण रक्षणासाठी मधमाशी (Honeybee) ही संपूर्ण निसर्गात खूप महत्त्वपूर्ण जीव आहे. मधमाशी सजीव सृष्टीसाठी नेमकी कशी उपयुक्त आहे याबाबत माहिती मिळवताना खूप सखोल ज्ञान विविध घटकांकडून मिळत आहे.

या सर्वांविषयी खूप कृतज्ञता! जिथं फुलोरा जास्त तिथं मधमाशीपालन (Beekeeping) जास्त होते. फुलोऱ्‍यात फुले जेव्हा येतात तेव्हा फुलांचे रूपांतर फळामध्ये होण्यासाठी परागीभवन ही क्रिया होणे खूप गरजेचे असते.

त्यामध्ये हवेद्वारे परागीभवन तर होतेच, पण मधपेट्या (Honey Box) जर आपण शेताच्या बांधावर ठेवल्या, तर मधमाश्यांमुळे परागीभवन होण्यास मदत होते. मधमाश्यांमुळे पिकांचे उत्पादनही वाढते. एपिस मेलिफेरा, सातेरी या जातींचे मधमाशीपालन प्रामुख्याने केले जाते. कारण या जाती कमीत कमी वेळेत जास्त मध उत्पादित करतात.

आयुर्वेदात पूर्ण अन्न म्हणून मधाकडे पाहिलं जातं. सकाळी आपण एक चमचा मध जरी घेतला, तरी त्यातून शरीराला आवश्यक घटक आणि ऊर्जा मिळते. आयुर्वेद शास्त्रानुसार आरोग्यासाठी नियमित मधाचे सेवन हे खूप गोष्टींसाठी फायदेशीर आहे.

अल्बर्ट आइन्स्टाईन हे शास्त्रज्ञ म्हणाले होते, की मधमाशी जेव्हा पृथ्वीतलावरून नष्ट होईल तेव्हा माणसांचे अस्तित्व ४-५ वर्षांत संपुष्टात येईल. म्हणजे मानव जात टिकून राहण्यासाठी मधमाशीपालन करणे किती गरजेचे आहे, हे आपल्या लक्षात आले असेल.

अशाच पुणे येथील पर्यावरणाचे रक्षण करणाऱ्‍या सारिकाताई सासवडे यांची मधमाशीपालन उद्योगासंदर्भात एक छोटीशी मुलाखत घेतली. त्यातून त्यांनी सविस्तर माहिती दिली.

प्रश्‍न १) मधमाशी ही शेतीसाठी कशाप्रकारे उपयुक्त आहे?
सगळ्या कीटकांमध्ये सगळ्यात वेगाने परागीभवन करणारा कीटक मधमाशी आहे. हवा, पाणी, जमिनीतून, फुलपाखरू, पक्ष्यांमार्फत परागीभवन होत असते. या सर्वांपेक्षा मधमाश्यांकडून परागीभवनाचा वेग अधिक असल्यामुळे पिकांचे उत्पादन वाढते.

मधमाश्यांची खूप मोठी भूमिका या अन्नसाखळीमध्ये आहे. शेतकऱ्‍यांच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण घटक मधमाशी आहे. मधमाश्यांचं एक पोळ नष्ट झालं, तर एक गाव नष्ट झाल्यासारखं असतं. मधमाशी जगली नाही, तर आपल्याला अन्न मिळणार नाही.

प्रश्‍न २) मधाचे शारीरिक फायदे काय आहेत?

मधाला जन्मापासून मृत्यूपर्यंत सेवन करण्याची प्रथा आहे. विविध आजारांवर मध दिला जातो. मधामुळे हिमोग्लोबिन वाढते. मध हा आरोग्यवर्धक आहे.

अन्नापेक्षाही मध जास्त महत्त्वाचा आहे. फक्त मध हा मधमाश्यांनी तयार केलेला, गावरान स्वरूपाचा आपल्याला मिळणे गरजेचे आहे. देवांचे अन्न म्हणूनही मध ओळखला जातो.

प्रश्‍न ३) मधमाश्‍यापालन व्यवसाय शेतकरी महिला भगिनींसाठी तसेच तरुणींसाठी कशाप्रकारे फायद्याचा आहे?
महिलांनी, तरुणांनी या उद्योगात येणं खूप गरजेचं आहे. कारण यात नैसर्गिक प्रकार खूप आहेत आणि यामुळे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला खूप मोठा हातभार मिळणार आहे. कारण बाहेरील देशातही याची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

यात संघटनही खूप महत्त्वाचे असते. आपण ग्रुप करून मधमाशीपालन केलं, तर सर्वांनाच त्याचा खूप फायदा होतो. घर बसल्याही महिलांना हा उद्योग करता येतो. फक्त जिथं फुल जास्त आहेत तिथं त्या पेट्या हलवाव्या लागतात.

या उद्योगातून फक्त मधच नाही तर मेण, रोन्दल, परागकण हेही मिळते. मधापासून अनेक चांगले पदार्थही बनवले जातात. उदा. मधाचे मोदक, चॉकलेट, साबण, फेसपॅक.

प्रश्‍न ४) मधमाशीपालन व्यवसाय परसबागेतून सुरू करता येईल का?
हो. परसबागेतून आपल्याला मिरची, कोथिंबीर, टोमॅटो असा भाजीपालाही करता येतो. परसबागेत एखादी मधपेटीही ठेवू शकतो.

प्रश्‍न ५) याचे प्रशिक्षण कुठे मिळते आणि ते कशा स्वरूपाचे असते?
याचे प्रशिक्षण सरकारी संस्थांमार्फत आणि आम्ही आमच्या सामाजिक संस्थेमार्फतही देतो.

प्रश्‍न ६) या उद्योगासासाठी किती भांडवल आवश्यक आहे?
सुरुवातीला काही पेट्यांवरही आपण हा उद्योग सुरू करू शकतो आणि हळूहळू मग पेट्या वाढवू शकतो. मधविक्रीतून जे उत्पन्न मिळेल त्यातून हा उद्योग वाढवता येतो. एका पेटीची किंमत साधारण ५००० ते ५५०० रुपये आहे.

प्रश्‍न ७) कोणत्या हंगामातील मध हा आरोग्यासाठी फायदेशीर आहे?
मध हा वर्षभर कोणत्याही ऋतूत शरीरासाठी चांगलाच आहे. आणि वेगवेगळ्या फुलांवरचे मध गोळा करून ते विविध प्रकारच्या आजारांवर औषध म्हणूनही उपयुक्त ठरतात.

प्रश्‍न ८) आपणास या व्यवसायाकडे येण्याची प्रेरणा कशी मिळाली?
पूर्वी मध पोळ्यातून काढण्यासाठी ते पोळे जाळले जायचे, त्यामुळे मधमाश्या मरायच्या. ते पाहून मला वाईट वाटले. कारण मधमाशी पर्यावरणासाठी किती महत्त्वाची आहे. ती वाचली पाहिजे. म्हणून मी सुरुवातीला प्रशिक्षण घेतले.

प्रशिक्षणानंतरही मी खूप माहिती मिळवली. समाज जागृती केली. पोळे न जाळताही मध कसा गोळा करायचा हे लोकांना पटवून दिले. आणि हळूहळू या व्यवसायात मी आपोआप पुढे येत गेले. महिलांना सोबत घेऊन मधाचे अनेक ब्रॅण्ड विकसित केले.

प्रश्‍न ९) मधमाशीपालन या उद्योगातून आपण समाजाला काय संदेश द्याल.
मधमाशी वाचवा, देश वाचवा

(आपणास या उद्योगाबाबत अधिक माहिती हवी असल्यास संपर्क क्रमांक ९४२३५७७१९६ सारिका सासवडे, शोध सामाजिक संस्था व वर्ल्ड क्वीन बीज)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT