Solapur News: महापुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांत शेती जमीन खरडून जाणे, वाहून जाणे तसेच गाळ साचण्याचे मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची दखल घेत राज्य सरकारने जिल्ह्यातील २० हजार ४२१ शेतकऱ्यांना ५७ कोटी ५८ लाख ९८ हजार रुपयांची मदत जाहीर केली असून, .पुढील आठवड्यापासून ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली..Flood Relief Fund: अतिवृष्टिग्रस्तांच्या मदतनिधीला शासनाकडून विलंब .बाधित शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्याचे काम सध्या सुरू असून, तालुक्यांकडून आतापर्यंत सात हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. उर्वरित याद्यांचे अपलोडिंग येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. महापुरात जमीन वाहून जाणे, .जमीन खरडून जाणे तसेच शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने एकूण १२ हजार ४६० हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. पिकांच्या नुकसानीप्रमाणेच या आपत्तीची मदतही शेतकऱ्यांना दिली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले..Flood Relief: धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची तारेवरची कसरत.तालुकानिहाय शेतकरी संख्याउत्तर सोलापूर : ९५२दक्षिण सोलापूर : ७४७मंद्रूप तहसील : १,०००अक्कलकोट : ३,१४०मोहोळ : ५,७३५.माढा : ४,२९०बार्शी : २,६५९करमाळा : १,२३८सांगोला : ३८पंढरपूर : १२०मंगळवेढा : ९२.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.