Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : हमीभाव, एफपीओंच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घ्या

Agriculture Issue : कृषी विभागामार्फत कोल्हापूर विभागातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा संवाद शुक्रवार (ता. २१) येथे झाला. त्या वेळी तिन्‍ही जिल्ह्यांतील विविध शेतकऱ्यांनी आपापले प्रश्न श्री. कोकाटे यांच्यापुढे मांडले.

Team Agrowon

Kolhapur News : केवळ पिकांच्या लागवडीबाबतची धोरणे न आखता काढणी पश्चात सुविधा, हमीभाव, एफपीओच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांना जलद सकारात्मक निर्णय घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी कोल्‍हापूर विभागातील (कोल्हापूर, सांगली, सातारा) शेतकऱ्यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे केली.

कृषी विभागामार्फत कोल्हापूर विभागातील प्रगतिशील व प्रयोगशील शेतकऱ्यांचा संवाद शुक्रवार (ता. २१) येथे झाला. त्या वेळी तिन्‍ही जिल्ह्यांतील विविध शेतकऱ्यांनी आपापले प्रश्न श्री. कोकाटे यांच्यापुढे मांडले.

भात, नाचणी, ऊस, सोयाबीन, काजू, डाळिंब आदी पिकांसाठी शासनाने भरीव योजना राबवाव्यात, अशी मागणी करण्यात आली. स्मार्ट सारख्या प्रकल्प कार्यवाही अभावी रखडले आहेत. या प्रकल्‍पांकडे शासनाचे लक्ष नसल्याने प्रकल्पातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

प्रत्येक टप्प्यावर कामे अडकत असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे या शेतकऱ्यांनी सांगितले. विषयाचे गांभीर्य पाहून ‘स्मार्ट’मधील अडचणी प्रश्नी लवकरच बैठक घेऊन प्रत्येक तपशिलावर उपाय काढण्याचा आपला प्रयत्न राहील, असे श्री. कोकाटे यांनी या वेळी सांगितले.

यावेळी पूरक उद्योग, प्रक्रिया उद्योग, गोदाम योजना, रखडलेले अनुदान विविध पिकांच्या हमीभावाबाबतही चर्चा झाली. प्रधान सचिव (कृषी) विकासचंद्र रस्तोगी, डॉ. अविनाश पोळ, शेतकरी प्रतिनिधी संजीव माने, विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, साताऱ्‍याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री पवार, कृषी उपसंचालक नामदेव परीट आदीं उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mango Management: वाढीच्या अवस्थेत आंबा बागेचे व्यवस्थापन आणि जुन्या झाडांचे पुनरुज्जीवन कसे करावे?

Agrowon Diwali Article: संघर्षातून बहरली समाधानी आयुष्याची बाग

Land Fragmentation Act: तुकडेबंदी कायदा रद्द झाला; अंमलबजावणीसाठी प्रतीक्षा करावी लागणार!

Sugarcane Crushing Season: गाळप हंगामासाठी नांदेड विभागातील २९ साखर कारखान्यांचे अर्ज

Agrowon Diwali Article: सर्वांगीण उन्नती साधणारी राजपुतांची शेतीसंस्कृती

SCROLL FOR NEXT