Manmad Market Committee agrowon
ॲग्रो विशेष

Manmad Market Committee : मनमाड बाजार समितीत कर्मचारी आक्रमक

Manmad Market Committee Workers : कर्मचाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही नसल्याने संताप वाढला, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या दिला.

Team Agrowon

Manmad Bajar Samiti : मनमाड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापतींची मनमानी तसेच तीन कर्मचाऱ्यांच्या निलंबनाच्या निषेधार्थ सोमवारपासून (ता. २६) पासून कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कर्मचाऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी कुणीही नसल्याने संताप वाढला, त्यानंतर कर्मचाऱ्यांनी बाजार समितीच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या दिला. या वेळी हमाल, मापारी तसेच व्यापाऱ्यांसह बाजार समितीतील सर्व घटकांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. काही काळ ‘ठिय्या’ दिल्यानंतर बाजार समितीचे कामकाज सुरळीत सुरू करण्यात आले.

बाजार समितीचे कर्मचारी राजकीय भांडणामध्ये भरडले जात आहेत. तर चुकीच्या पद्धतीने बाजार समिती कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये सचिव बळीराम चौधरी, सुपरवायझर वसंत घुगे, प्रभारी सचिव मीना बाविस्कर यांचा समावेश आहे. तर इतर बाजार समिती कर्मचाऱ्यांना किरकोळ कारणांवरून निलंबित करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. याप्रकरणी कर्मचाऱ्यांचा संताप उफाळून आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर बाजार समिती कर्मचाऱ्यांनी मागण्यांचे निवेदन देण्यासाठी बाजार समिती प्रशासकीय कार्यालयासमोर उपस्थिती लावल्याचे समजते. सभापती किंवा जबाबदार व्यक्ती येथे निवेदन घेण्यासाठी आले नव्हते, त्यामुळे कर्मचाऱ्यांनी ठिया दिला. नंतर कर्मचाऱ्यांनी कामकाज सुरू केल्याचे समजते.

बाजार समिती कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची लेखी माहिती जिल्हा उपनिबंधक व पणन संचालकांना दिली आहे. मागील काही महिन्यांपासून पगार न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही असंतोष आहे. येत्या पंधरा दिवसांत मागण्या मान्य न केल्यास कामबंद आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

संचालक-व्यापारी वादामुळे लिलाव ठप्प

लिलाव सुरू असताना संचालक माजी आमदार संजय पवार आणि कांदा व्यापाऱ्यांमध्ये वाद झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी लिलाव न करण्याचा निर्णय घेतला. परिणामी, शेकडो ट्रॅक्टरमधील कांदा बाजार समितीच्या आवारात दिवसभर तसाच पडून राहिला. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्यापाऱ्यांनी संबंधित संचालकांविरोधात पोलीस स्थानकात धाव घेतली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

Washim Drought Survey: वाशीम जिल्ह्यात दुष्काळसदृश्य स्थितीची तातडीने पाहणी करा : दत्तात्रय भरणे

Rain Update: पश्चिम विदर्भात पावसाच्या सरी; खरीपाचे भवितव्य अधांतरी

El Nino Impacts: 'एल निनो'चं संकट; शेतकऱ्यांना मदत मिळणार, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वालांची माहिती

SCROLL FOR NEXT