Chana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

Rabi Season : डहाणूतील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातपिकाची कापणी पूर्ण केली आहे. उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने हरभऱ्याच्या लागवडीवर भर दिला आहे.

Team Agrowon

Palghar News : डहाणूतील शेतकऱ्यांनी काही दिवसांपूर्वी भातपिकाची कापणी पूर्ण केली आहे. उन्हाळी हंगामासाठी कृषी विभागाने हरभऱ्याच्या लागवडीवर भर दिला आहे. मात्र, यावर्षी कासा, वाघाडी व भराड परिसरातील कालव्यांच्या दुरुस्तीमुळे सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार नाही. त्या‍ पार्श्वभूमीवर कृषी विभागाने हेक्टरी ७० किलो हरभऱ्याचे अनुदानित बियाणे शेतकऱ्यांना वितरित केले आहे.

दरवर्षी सूर्या प्रकल्पातील कालव्यांमधून मिळणाऱ्या सिंचनाच्या पाण्यामुळे शेतकरी भात, भाजीपाला, मिरची, गवार आणि उन्हाळी पिके घेत असतात. मात्र, यावर्षी कालव्याच्या पाण्याचा अभाव असल्याने शेतकऱ्यांनी हरभरा आणि तुरीसारख्या कमी पाणी लागणाऱ्या पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.

त्याच पार्श्वभूमीवर डहाणू तालुक्यातील वाघाडी गावात भातपिकाच्या कापणीचे प्रात्यक्षिक व हरभरा लागवडीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. त्यानंतर बी-बियाणे वाटपाचा कार्यक्रम झाला.

या कार्यक्रमाला कृषी विभागातील अधिकारी नलगुरवार, उमेश पवार, वाघमारे, लाडे, पाटील; तसेच कृषी विज्ञान केंद्राचे अनिल नलगुरवार उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन कृषी सेवक अनिल आंबेकर यांनी केले.

कृषी विभागासोबतच सामाजिक संस्थाही गरीब शेतकऱ्यांना मदत करत आहेत. बी-बियाण्यांचे वाटप, मार्गदर्शन, तसेच उत्पादनवाढीसाठी नवनवीन प्रयोग यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

Soybean Market : केंद्राचे परिपत्रक तरीही राज्याचा निर्णय होईना

SCROLL FOR NEXT