Ravikant Tupkar Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar News : सोयाबीन-कापूस-संत्रा उत्पादकांसाठी ‘स्वाभिमानी’ची एल्गार रथयात्रा

Soyabean Market Rate : सोयाबीन, कापूस, भात, संत्र्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून एल्गार रथयात्रा काढण्यात येणार आहे

Team Agrowon

Nagpur News : सोयाबीन, कापूस, भात, संत्र्याला बाजारात अपेक्षित दर मिळत नाही. त्यातूनच नैराश्‍य आणि आत्महत्या वाढीस लागण्याचा धोका आहे. परिणामी विदर्भ-मराठवाड्यातील पारंपरिक पिकांचे उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्‍न न सोडविल्यास येत्या १ नोव्हेंबरपासून शेगाव येथून एल्गार रथयात्रा काढत २० नोव्हेंबर रोजी बुलडाण्यात एल्गार मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रवीकांत तुपकर यांनी दिला.

एल्गार रथयात्रेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यभरात दौरा करीत संघटना पदाधिकारी, शेतकऱ्यांशी श्री. तुपकर संवाद साधणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात त्यांनी बुधवारी (ता. २५) नागपुरातून केली. त्यापूर्वी प्रेस क्‍लबमध्ये पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. शेतकरी नेते, प्रशांत गावंडे, रवी पाटील अरबट, स्वाभिमानीचे अमरावती जिल्हा अध्यक्ष कपील पडघान आदी या वेळी उपस्थित होते.

तुपकर म्हणाले, की कापसाचा उत्पादकता खर्च ३६ हजार २०० रुपये असून उत्पादकता एकरी पाच क्‍विंटल आणि दर ४२०० रुपये क्‍विंटल आहे. त्यावरूनच एकरी उत्पादकता खर्चही निघणे अवघड आहे. कापूस, भात, संत्र्याची स्थितीदेखील अशीच आहे.

त्यामुळे सरसकट एकरी दहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांनी पक्षाचे झेंडे बाजूला ठेवत शेतकरी म्हणून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. या वेळी उपस्थित होते.

शेतकरी पक्षापक्षात विखुरला

विदर्भ-मराठवाड्यात माणसे राहतात हे सरकार मान्यच करीत नाही. परिणामी या भागात नैराश्‍य, आत्महत्या होतात. मात्र यापुढे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता ज्यांनी अशी वेळ आणली त्यांची हत्या करावी.

सोयाबीनचे दर वाढीसाठी सोया पेंडची निर्यात केली पाहिजे. कापूस, भात, संत्र्याच्या बाबतीतही असेच धोरण हवे. परंतु निर्यातीऐवजी शहरी मतदारांना खूश करण्यासाठी शेतीमालाची आवक केली जाते. शेतकरी पक्षापक्षात विखुरला असल्याने ही परिस्थिती उद्‌भवते, असे रविकांत तुपकर यांनी या वेळी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT