Cashew Farmers Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Cashew Farmer Protest : सावंतवाडीत काजू उत्पादकांचा एल्गार

Team Agrowon

Sindhudurg News : शासनाने जाहीर केलेल्या काजू अनुदान निर्णयातील जाचक अटी दूर करून त्याचे तातडीने वितरण करावे, यासह विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील काजू उत्पादक शुक्रवारी (ता. ४) सावंतवाडी प्रांत कार्यालयासमोर एकवटले आहेत.

सहाशेहून अधिक काजू उत्पादकांनी उपोषण सुरू केले आहे. भरपावसात शेतकरी आंदोलनात सहभागी झाले असून, जोरदार घोषणाबाजी करीत असल्याचे चित्र आहे.

राज्य शासनाने जाहीर केलेले २७९ कोटी अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. शासन निर्णयातील जाचक अटी, शर्थी शिथिल करण्यात याव्यात. काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये किलो दर मिळावा, डॉ. स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी व्हावी, आयात शुल्क २० टक्के करावे या मागण्यांसाठी जिल्ह्यातील काजू उत्पादकांनी उपोषण सुरू केले आहे.

फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत, संजय देसाई, श्यामसुंदर राय, अण्णा केसरकर, सर्व्हेश नारकर, डॉ. मोहन दळवी, सुरेश गावडे, लक्ष्मण नाईक, प्रवीण परब यांच्यासह सहाशेहून अधिक काजू उत्पादकांनी कार्यालयाबाहेर ठाण मांडले आहे.

जय जवान जय किसान, काजू बीला हमीभाव मिळालाच पाहिजे, फळबागायतदार संघाचा विजय असो, या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

Congress questions on Modi's visit : राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी जीवन संपवले, भाजपने काय केलं? काँग्रेसचा मोदींना सवाल

Organic Pesticide : जैविक कीटकनाशक ‘मेटाऱ्हायझियम’

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

SCROLL FOR NEXT