Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : साडेअकरा हजार खाती ‘रिजेक्ट’

Latest Agriculture News : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी, यासाठी ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. चुकीचे बँक खाते, आयएफएसकोड यामुळे तब्बल ११ हजार ४७१ नोंदी रिजेक्ट झालेल्या आहेत. तालुकास्तरावरून दुरुस्ती करून अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे या महिन्यांत अवकाळी पाऊस, ऑक्टोबर २०२१चा मान्सून व सप्टेंबर व ऑक्टोबर २०२२मध्ये झालेली अतिवृष्टी व पुरामुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले. शेतपिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी, याकरिता ई-पंचनामा पोर्टल सुरू करण्यात आले आहे. तालुकास्तरावरून आतापर्यंत ७३ हजार ९१० बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे.

जिल्हास्तरावरून ७१ हजार १५ नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहेत. चुकीचे बँक खाते, आयएफएस कोड यामुळे ११ हजार ४७१ नोंदी रिजेक्ट करण्यात आलेल्या आहेत. तालुकास्तरावरून दुरुस्ती करून अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत शासनस्तरावरून डीबीटी पद्धतीद्वारे ३५ हजार ३७१ बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात २३ कोटी २१ लाख ६७ हजार ६१३ रुपये इतका निधी जमा करण्यात आलेला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अजूनही ३५ हजार ६४४ बाधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे त्यांच्या खात्यात मदत निधी शासनस्तरावरून वितरित करण्यात अडचण येत आहे. तालुका कार्यालयातून व्हीके नंबर प्राप्त करून बाधित शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी करावे.

त्यानंतरच शासनस्तरावरून मदत थेट खात्यात जमा होणार आहे. पोर्टलवर ई-पंचनामा केलेल्या काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी केलेली नाही. शेतकऱ्यांनी तातडीने ते करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

३५ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण बाकी

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. बाधित शेतकऱ्यांसाठी शासनाने मदत जाहीर केली. मात्र, खाते क्रमांक व ई-केवायसी नसल्याने शेतकऱ्यांना मदतीबाबत अडचणी येत आहेत. ३५ हजार शेतकऱ्यांची ई-केवायसी रखडली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ ई-केवायसी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raju Shetti: १२९ कारखान्यांकडे २ हजार कोटींची एफआरपी थकित, राजू शेट्टींची साखर आयुक्तांकडे तक्रार

Soybean Farmers Protest: सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी, 'स्वाभिमानी'चे गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन

Special Agriculture Zone: कर्नाटकात शेती व्यतिरिक्त जमिनीच्या खरेदी-विक्री ला बंदी ; १ हजार ७७७ एकरवर विशेष कृषी क्षेत्राची निर्मिती  

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना महिन्याला २,१०० रुपये देऊ; एकनाथ शिंदेंची ग्वाही

Sugarcane Payment: मांजरा कारखान्याकडून २७५० रुपयांचा हप्ता जमा

SCROLL FOR NEXT