Electrochlorination Agrowon
ॲग्रो विशेष

Water Purification : धाराशिव जिल्ह्यात ७०५ गावांत ‘इलेक्ट्रोक्लोरिनेशन’

Electrochlorination : ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी इलेक्ट्रोक्लोरीनेशन ही जलशुद्धीकरण यंत्रणा गावागावात बसविण्यात येत आहे.

Team Agrowon

Dharashiv News : ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी इलेक्ट्रोक्लोरीनेशन ही जलशुद्धीकरण यंत्रणा गावागावात बसविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाद्वारे जिल्ह्यातील ७०५ गावात ही जलशुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येत आहे. १७१ गावात ही यंत्रणा बसवून कार्यान्वित करण्यात आली आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत राज्य पाणी स्वच्छता अभियानामार्फत खासगी संस्थेद्वारे ही यंत्रणा जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर उभारण्यात येत आहे. ग्रामीण भागातील लोकांना निर्जंतुक पिण्याचे पाणी मिळावे, असा ही यंत्रणा बसविण्यामागे शासनाचा उद्देश असल्याचे सांगितले आहे.

धाराशिव जिल्ह्यात ही यंत्रणा उभारणीच्या नियोजन कामासाठी नोडल अधिकारी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठ्याचे कार्यकारी अभियंता आहेत. सातशे पाच गावात ही यंत्रणा उभारणीचे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे.

ज्या खाजगी संस्थेला ही यंत्रणा उभारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या संस्थेने गावांचे सर्वेक्षण करून ६८८ गावासाठीचा प्रस्ताव संबंधित विभागाच्या मंजुरीसाठी सादर केला आहे. त्यानुसार २३५ गावात बसविण्यासाठी २३६ इलेक्ट्रोक्लोरीनेशनच्या मशिनरी देण्यात आल्या आहेत.

यापैकी १७१ गावात ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. २५, ५०, १००, १५०, २००, २५० ग्रॅम प्रतितास क्षमतेच्या वेगवेगळ्या यंत्रणा लोकसंख्येनुसार बसविण्यात येत आहेत,

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection : नांदेड जिल्ह्यात आमदार रोहित पवार शेतकऱ्यांच्या बांधावर

Dam Water Levels : लघू प्रकल्पात १२, मध्यम प्रकल्पात १४ टक्के पाणीसाठा

Road Protest : सासुरे-कौठाळी रस्त्यासाठी ‘रास्ता रोको’

Water Scarcity : पाणीटंचाई टाळण्यासाठी वर्षभराचे नियोजन करा; पालकमंत्री जयकुमार गोरे

Goat Farming : शास्त्रीय व्यवस्थापनातून शेळीपालनात शाश्वत उत्पन्न

SCROLL FOR NEXT