Electricity Transmission Line Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Transmission Line : ‘राजगडा’वरील विद्युतवाहिनी धोकादायक स्थितीत

Rajgad Dangerous Condition : किल्ले राजगडाकडे जाणाऱ्या मार्गावरील पाली दरवाजा परिसरात एक विद्युतवाहिनी आहे.

Team Agrowon

Pune News : किल्ले राजगडाकडे जाणाऱ्या मार्गावरील पाली दरवाजा परिसरात एक विद्युतवाहिनी आहे.

सध्या ही विद्युतवाहिनी तुटण्याच्या अवस्थेत असून कोणत्याही क्षणी अपघात होण्याच्या शक्यतेमुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. या धोकादायक विद्युतवाहिनीची दुरूस्तीची मागणी त्यांनी केली आहे.

शेतकरी पांडुरंग दरडिगे यांनी सांगितले की, पाऊस थांबल्यामुळे राजगडाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. गडाकडे जाणाऱ्या विद्युतवाहिनीची स्थिती धोकादायक झाली आहे. विजेच्या खांबावरील संरक्षक तार तुटली असून मुख्य विद्युतवाहिनीमधील तारा कोणत्याक्षणी तुटून अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

राज्याच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या अखत्यारित असलेल्या पुणे विभागाच्या सहायक संचालकांना या समस्येची माहिती देण्यात आली आहे.

राजगडाची देखभाल पुरातत्त्व खात्याकडून केली जात असून गडावर संवर्धनाची कामे सुरू आहेत. पुरातत्त्व खात्याने महावितरणशी संपर्क साधून विद्युतवाहिनीची दुरुस्ती करावी. तसेच गडावरील संपूर्ण विद्युतवाहिनीचे परीक्षण करावे, असे श्री.दरडिगे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pune Fruit Market: उन्हाळी हंगामात फळे तेजीत

Education Reform: शिक्षणात सुधारणा ही सामूहिक जबाबदारी

Ethanol Fuel: इथेनॉल ठरेल पर्यायी इंधन

Namo Shetkari Mahasamman Yojana: ‘नमो’चा आठवा हप्ता पुढील आठवड्यात

Pune ZP: पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वीरधवल जगदाळे

SCROLL FOR NEXT