Election
Election Agrowon
ॲग्रो विशेष

Palghar Apmc Election : पालघरमध्ये बाजार समित्यांच्या निवडणुकीचे बिगुल

Team Agrowon

Virar Apmc News : पालघर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे (Agriculture Produce Market Committee Elections) बिगुल वाजले असून निवडणुकीसाठी मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. वसई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १९ जागांसाठी २८ एप्रिलला मतदान होणार आहे.

या निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे पालघर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी, भाजप व शिवसेना (शिंदे गट), श्रमजीवी संघटना यांच्यात मुख्य लढत होण्याची शक्यता आहे.

वसई कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्ह्यात राजकारण रंगणार आहे.

राज्यात गेल्या काही महिन्यांत बदललेल्या राजकारणामुळे बाजार समितीच्या निवडणुकीबाबत उत्सुकता वाढली आहे. महाविकास आघाडी एकत्र लढणार का, शिवसेना (शिंदे गट) व भाजप गट एकत्र येणार का, असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

पालघर आणि डहाणू कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता राहिली आहे. वसईत बहुजन विकास आघाडी एकहाती निवडणुकीला सामोरी जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या वेळी वसईत ही निवडणूक बिनविरोध झाली होती. त्यात विरोधकांना काही जागा दिल्या गेल्या असल्या तरी सत्ता मात्र बहुजन विकास आघाडीने आपल्याच हाती ठेवली होती.

निवडणूक प्रक्रिया

उमेदवारी अर्ज : २७ मार्च ते ५ एप्रिल

अर्ज छाननी : ५ एप्रिल

उमेदवार यादी प्रसिद्ध : ६ एप्रिल

उमेदवारी माघार : २१ एप्रिल

मतदान : २८ एप्रिल

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Update : खुशखबर ! मॉन्सून ३१ मे पर्यंत केरळात होणार दाखल

Loksabha Election 2024 : कोण निवडून येणार? आकडेमोडीत गुंतले कार्यकर्ते

Crop Damage : माळीनगरची पिके पाण्याअभावी होरपळली

Pre Monsoon Rain : देवळा तालुक्यात वादळी पावसाने दाणादाण

Agriculture Funds : कृषी योजनांतून ३७ कोटींवर निधी खर्च

SCROLL FOR NEXT