Lok Sabha Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Lok Sabha Election : पुणे जिल्ह्यात मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

Vote Counting : दुपारी चार वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील या प्रकारे नियोजन करण्यात आल्याचे दिवसे यांनी सांगितले.

Team Agrowon

Pune News : जिल्ह्यातील पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ या चार लोकसभा मतदार संघांची मतमोजणी मंगळवारी (ता ४) विविध ठिकाणी होत असून, मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. या वेळी पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, रोहिदास पवार, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.

बारामती आणि पुणे लोकसभा मतदार संघांची मतमोजणी कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामध्ये, शिरूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रांजणगाव (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामामध्ये, तर मावळ लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथील वेटलिफ्टिंग हॉलमध्ये होणार आहे. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील या प्रकारे नियोजन करण्यात आल्याचे दिवसे यांनी सांगितले.

सकाळी ईव्हीएम यंत्रे आणि टपाली मतपेट्या ठेवलेल्या सुरक्षा कक्षांचे (स्ट्राँग रूम) सील निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी आदी तसेच उमेदवार आणि उमेदवारांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत काढल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया करून मतमोजणीला प्रारंभ केला जाईल. प्रारंभी सकाळी ८ वाजता टपाली मतदान आणि ईटीपीबीएस मतांची मोजणी सुरू होईल.

ईव्हीएमच्या मतमोजणीची सुरुवात ८ वाजून ३० मिनिटांनी होईल. मतमोजणी कक्षातील सर्व कामकाजाचे सीसीटीव्हीद्वारे संपूर्ण रेकॉर्डिंग करण्यात येणार असून याशिवाय व्हिडिओ कॅमेराद्वारेही चित्रीकरण करण्यात येणार आहे.

मतमोजणी केंद्रात मोबाईल आणण्यास मनाई

निवडणुकीच्या मतमोजणीची फेरीनिहाय आकडेवारी मतमोजणी केंद्राच्या ठिकाणाहून ध्वनीक्षेपकाद्वारे वेळोवेळी घोषित केली जाईल. मतमोजणी केंद्रामध्ये उमेदवार, निवडणूक प्रतिनिधी तसेच मतमोजणी प्रतिनिधी यांना मोबाईल सोबत बाळगण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. वैध ओळखपत्र नसलेल्या कुठल्याही अनधिकृत व्यक्तीला मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

मतमोजणीसाठी टेबल आणि फेऱ्यांची रचना

प्रत्येक लोकसभा मतदार संघात विधानसभा मतदार संघनिहाय स्वतंत्रपणे मतमोजणी टेबल लावण्यात येणार आहेत. मावळ लोकसभेची मतमोजणी प्रक्रिया ११६, पुणे लोकसभा ११२, बारामती-१२४ व शिरूर लोकसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया ११२ टेबलद्वारे होणार आहे.

मावळमधील पनवेल आणि चिंचवड विधानसभा मतदार संघांसाठी प्रत्येकी २४ टेबल लावण्यात येणार असून मतमोजणीसाठी २३ फेऱ्या होणार आहेत. कर्जत आणि उरण विधानसभा मतदार संघांसाठी प्रत्येकी १४ टेबल आणि २४ फेऱ्या तर मावळ आणि पिंपरी विधानसभा मतदार संघांसाठी १६ टेबल लावण्यात येणार आहे. मावळसाठी २४, तर पिंपरीसाठी २५ फेऱ्या होणार आहेत. तसेच पोस्टल व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ८ टेबल लावण्यात येणार आहेत.

मतमोजणीसाठी मनुष्यबळाची नियुक्ती

ईव्हीएम मतमोजणीसाठी एकूण ६५६ मतमोजणी सहायक, ६०० मतमोजणी पर्यवेक्षक आणि ६४० सूक्ष्म निरीक्षक असे एकूण १ हजार ८९६ मनुष्यबळ, तर टपाली व ईटीपीबीएस मतमोजणीसाठी ४७ मतमोजणी पर्यवेक्षक, ६९ मतमोजणी सहायक आणि ५८ सूक्ष्म निरीक्षक असे १७४ याप्रमाणे एकूण २ हजार ७० मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Export : राज्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार शेतकऱ्यांची नोंदणी

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Banana Rate : केळीची कमी दराने खरेदी सुरूच कारवाईसत्र राबविण्याची मागणी

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

SCROLL FOR NEXT