Market Committee Election Agrowon
ॲग्रो विशेष

Market Committee Election : सोलापूर, बार्शी, करमाळा बाजार समित्यांची निवडणूक तयारी सुरू

Solapur Market Committee Election Update : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत जुलैमध्ये संपत आहे.

Team Agrowon

Solapur APMC Election News : सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर आणि बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत जुलैमध्ये संपत आहे. तर करमाळ्याची मुदत ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर या तीनही बाजार समितीच्या निवडणुकीसाठीची पूर्वतयारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयस्तरावर सुरू आहे.

या निवडणुकीच्या मतदार यादीसाठी ग्रामपंचायत स्तरावरील यादी गटविकास अधिकारी आणि विकास सेवा सोसायटीच्या मतदारांसाठी सहायक निबंधकांकडे मागवण्यात आली आहे.

गेल्या महिन्यातच पंढरपूर, सांगोला, अक्कलकोट, माढा यांसह आठ बाजार समित्यांच्या निवडणुका झाल्या. त्यानंतर आता उर्वरित या तीन बाजार समित्यांच्या निवडणुकांकडेही लक्ष लागले होते. येत्या जुलैमध्ये सोलापूर, बार्शीची मुदत संपत आहे.

त्यामुळे किमान १८० दिवस यासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. करमाळ्याला वेळ असला, तरी आतापासून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून या याद्या तत्काळ सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासंबंधीचे पत्र उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, करमाळा येथील गटविकास अधिकारी व सहायक निबंधक यांना काढण्यात आलेले आहे.

मुदतवाढीचा प्रस्ताव प्रलंबित

मुदत संपणाऱ्या सोलापूर, बार्शी बाजार समित्याच्या संचालक मंडळांना सहा महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करणारा ठराव आधीच या बाजार समित्यांनी जिल्हा उपनिबंधकांच्या माध्यमातून पणन संचालकांकडे पाठवला आहे.

पणन संचालकांकडून हा प्रस्ताव पुढे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे पाठवला आहे. पण अद्यापही तो प्रलंबितच आहे. त्याबाबत मंत्री सावे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Government Fund Utilization: मार्चअखेर ‘लेट नाईट’ विनियोग

Mango Farmers: बागायतदार शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडून व्याजसवलत

Hailstorm Crop Damage : गारपीटग्रस्त कांदा पिकासाठी उपाययोजना

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाच्या आराखड्यात बदल

Onion Procurement Scam: कांदा खरेदीमध्येही भोंदू खरातचा महाघोटाळा

SCROLL FOR NEXT